भाविकदास करमनकर
धानोरा तालुका प्रतिनिधी
धानोरा येथील श्री. साईबाबा ग्रामीण विकास संस्था गडचिरोली व्दारा-संचालित श्री. जीवनराव सिताराम पाटील मुनघाटे कला-वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात दिनांक १५ नोव्हेंबर २०२५ ला सांस्कृतिक विभागाच्या वतीने भगवान बिरसा मुंडा जयंती निमित्त “जनजाती गौरव दिन” मोठ्या उत्साहात साजरा करण्यांत आला.
याप्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्धानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ उदय एस.थुल उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरूवात भगवान बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून अभिवादनाने करण्यांत आली.
यावेळी आदिवासी समाजाचे प्रेरणास्त्रोत, क्रांतिकारी समाजसेवक,जननायक बिरसा मुंडा यांनी ब्रिटिश सरकार विरूद्ध आंदोलन करून आदिवासी समाजावर होणारा अन्याय दूर करण्यासाठी “उलगुलान” ही चळवळ सुरू केली. जल, जंगल,व जमीनीवर आदिवासी जमातीचा नैसर्गिक अधिकार आहे तो कुणीही हिरावून घेऊ शकत नाही यासाठी आदिवासी समाजाला एकत्रीत करून जनजागृती घडवून आणली.
त्यामुळे त्यांना “धरती आबा”अर्थात पृथ्वीचे जनक म्हणून संबोधले जाते त्यांच्या सांस्कृतिक, धार्मिक, सामाजिक कार्यासाठी आदिवासी समुहाने “जननायक” ही उपाधी बहाल केली अशा थोर क्रांतिकारकाच्या समाजकार्याची प्रेरणा आजही दिशादर्शक ठरणारी आहे असे विचार उपस्थितांनी व्यक्त केले.
याप्रसंगी डॉ आर पी किरमीरे डाॅ विणा जम्बेवार डॉ पंकज चव्हाण डॉ गणेश चुदरी डॉ पंढरी वाघ डॉ हरीष लांजेवार डॉ संजय मुरकुटे डॉ दामोधर बी झाडे डॉ नितेश पुण्यप्रेड्डीवार प्रा मांतेश तोंडरे डॉ सचिन धवनकर डॉ प्रियंका पठाडे प्रा ज्ञानेश बनसोड प्रा धाकडे प्रा खोबरागडे प्रा वटक प्रा आवारी प्रा रणदिवे मानापुरे लांबट बोंगीरवार कायते नन्नावरे श्रीमती चंदेल श्री वाढणकर श्री राजगडे यांची उपस्थिती होती.
कार्यक्रमाचे संचालन प्रास्तावीक व आभार प्रदर्शन प्रा प्रशांत वाऴके यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सांस्कृतिक विभागातील सर्व स्वंयसेवक विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होती.



