Home Political आळंदीत प्रभाग १० मध्ये शिवसेनेच्या संगिता राहूल चव्हाण यांचा अर्ज दाखल… ...

आळंदीत प्रभाग १० मध्ये शिवसेनेच्या संगिता राहूल चव्हाण यांचा अर्ज दाखल… — खासदार श्रीरंग बारणे व उपनेते इरफान सय्यदांची उपस्थिती…

दिनेश कुऱ्हाडे 

   उपसंपादक 

आळंदी : आळंदी नगरपरिषद निवडणूक 2025 साठी प्रभाग क्रमांक १० मधून शिवसेनेच्या (शिंदे गट) संगिता राहूल चव्हाण यांनी सोमवार रोजी उमेदवारी अर्ज दाखल केला. या वेळी खासदार श्रीरंग बारणे व शिवसेना उपनेते इरफान सय्यद हे विशेष उपस्थित होते. दोन्ही नेत्यांनी संगिता चव्हाण यांच्या उमेदवारीस शुभेच्छा देत प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी शिवसेना कटिबद्ध असल्याचा विश्वास व्यक्त केला.

       अर्ज दाखल केल्यानंतर संगिता राहूल चव्हाण म्हणाल्या, “प्रभाग १० च्या नागरिकांचे प्रश्न सोडवणे हीच माझी प्राथमिकता आहे. पाणीपुरवठा, रस्त्यांची सुधारणा, स्वच्छता आणि महिलांच्या सुरक्षेसाठी ठोस पावले उचलणार आहोत.”

         अर्ज दाखल करण्यास सुरुवात झाल्यापासून प्रभागात राजकीय हालचालींना वेग आला असून कार्यकर्त्यांची मोठी गर्दी यामुळे उत्साहात भर पडली आहे. निवडणुकीचे वातावरण दिवसेंदिवस अधिक रंगत चालले आहे.