बीकेसीपीची कु.अन्यया मंगर शालेय विभागिय स्पर्धेत प्रथम..

 

कमलसिंह यादव 

तालुका प्रतिनिधी पारशिवनी 

 

कन्हान : – नागपुर विभागिय शालेय खेळ स्पर्धेत १४ वर्ष गटाच्या आतील मुलीच्या शंभर मीटर धावने स्पर्धेत बीकेसीपी शाळेची कु.अन्यया मंगर हिने प्रथम क्रंमाक पटकावित राज्य स्पर्धेत आपला प्रवेश निश्चित केला आहे. 

          मानकापुर नागपुर येथे दोन दिवसीय नागपुर विभागिय शालेय खेळ स्पर्धा २०२३ अंतर्गत शुक्रवार (दि .१३) ऑक्टोंबरला वयोगट १४ वर्ष आतील मुलीच्या १०० मीटर धावनी स्पर्धेत बीकेसीपी शाळा कन्हानची विद्यार्थींनी खेडाळु कु.अन्यया अनिल मंगर हिने प्रथम क्रंमाक पटकावित पुढे होणा-या राज्य शालेय खेळ स्पर्धेत आपला प्रवेश निश्चित केला आहे. 

             कु.अन्यया मंगर हिने या यशाचे श्रेय तिचे आईवडिल व बीकेसीपी शाळेचे क्रिडा शिक्षक व एनआयएस प्रशिक्षक श्री. अमितसिंह ठाकुर यांना दिले आहे.

           या विजया बद्दल बीकेसीपी शाळेचे संचालक राजीव खंडेलवाल,सचिव पुष्पा गैरोला,माध्य.मुख्याध्यापिका कविता नाथ,प्राथ.मुख्याध्यापिका रुमाना तुर्क,शिक्षक विनय कुमार वैद्य,युनिस कादरी,सविता वानखेडे,रेणु राऊत आदींसह शाळेतील सर्व शिक्षक आणि कर्मचारी वृंदानी कु.अन्यया मंगर तसेच प्रशिक्षक अमितसिंह ठाकुर यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.