घुगशी ( पारशिवनी) ते रामटेक बस पास चालू करण्यात यावी.  — पारशिवनी तालुका मनसेची मागणी. — अन्यथा आंदोलन..

 

       कमलसिंह यादव 

तालुका प्रतिनिधी पारशिवनी 

 

पारशिवनी:-महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पारशिवनी तालुकाध्यक्ष डॅनी धनोरे व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हा उपाध्यक्ष तथा ग्राम पंचायत सदस्य कुंदन राऊत यांचा मार्गदर्शनात रामटेक आगार प्रमुख यांना पारशिवनी तालुका बस समस्येबाबत निवेदन देण्यात आले.

         शालेय शिक्षण घेणाऱ्या मुलांना घुगशी ते रामटेक पर्यंत बस प्रवास करण्यासाठी बस पास ही घुगशी ते रामटेक पर्यंत न देता माहुली ते रामटेक दिली जात होती.

        त्यामुळे प्रवास भाड्याचा विद्यार्थ्यांवर अधिक आर्थिक भार पडत होता.यामुळे शालेय शिक्षण घेणाऱ्या मुलांना अधिकच्या आर्थिक भाराचा त्रास होत होता.

         त्यावर लवकरात लवकर कार्यवाही करून घुगशी ( पारशिवनी) ते रामटेक बस पास चालू करण्यात यावी अशी विनंती मनसे द्वारा संबंधित बस व्यवस्थापक यांना करण्यात आली.

          जर या समस्येचे निवारण झाले नाही तर आंदोलनाची चेतावनी महाराष्ट् नव निमार्ण सेना पारशिवनी तालुका अध्यक्ष डैनी धानोरे याचे मार्फत देण्यात आली आहे.