अत्यल्प पावसामुळे दर्यापूर शहरातील पर्यटकांनी निसर्गाकडे फिरवली पाठ… — खाजगी वाहन धारकांच्या व्यवसायावर उपासमारीची वेळ… — उच्चपदस्थ व नोकरदार हे सुद्धा देत आहेत आपली वाहने भाडेतत्त्वावर…

युवराज डोंगरे/खल्लार

    उपसंपादक

      पावसाळा जवळपास संपत आल्यातच जमा आहे.गेल्या शंभर वर्षाच्या तुलनेत यावर्षीचा पावसाळा हा सर्वात कमी पावसाळा म्हणुन ठरला आहे शहरासह भारताची अर्थव्यवस्था ही शेतीवर अवलंबून असून या शेतीला पिकविण्या साठी पाण्याशिवाय पर्याय नसतो केवळ पावसाच्याचं पाण्यावर बहुतांश शेती अवलंबून आहे तर काही ठिकाणी विविध स्त्रोतांच्या माध्यमातून शेतीला पाणी पुरवल्या जाते परंतु पावसाळ्याचे पाणी हेच सर्वश्रेष्ठ व शेतीसाठी पौष्टिक असून त्या पावसाने यावर्षी पूर्णपणे पाठ फिरवली आहे या अत्यल्प पावसाचे परिणाम जवळपास सर्वच व्यवसायावर पडले आहे, विशेषतः खाजगी वाहनधारक बाजारपेठा शैक्षणिक संस्था सर्वसामान्यांची दैनंदिनी शेतकरी शेतमजूर व्यावसायिक यांचे व्यवसाय पूर्णपणे डबघाईला येण्यास सुरुवात झाली आहे यातच शहरातील मधील खाजगी वाहन चालकावर मोठी उपासमारीची वेळ लहरी निसर्गाने आनली आहे जे खाजगी वाहन धारक आपला शासकीय नियमितपणे कराचा भरणा करीत आहेत त्यांच्यावर अधिक प्रमाणात ताण ओढवल्या गेला आहे तर शहरात जवळपास शेकडो खाजगी वाहनधारक असून त्यांना या दिवसात कुठलेही भाडे नसल्याने दिवसभर आपली वाहने इतरत्र उभी करावी लागतात खाजगी वाहनधारकांनी ह्या बाबत आपला तीव्र संताप अध्ययन समाचार सोबत बोलताना व्यक्त केला.

       शहरातील उच्चपदस्थ व शासकीय नोकरीत समाविष्ट असलेले शिक्षक वर्ग,प्राध्यापक वर्ग , शिक्षकेतर कर्मचारी वर्ग यांनी आपल्याकडील खाजगी वाहने सुद्धा भाडे तत्त्वावर देण्याला सुरुवात केली असल्याने याचा खाजगी वाहनधारकांवर मोठा परिणाम पडला असून खाजगी वाहनधारकांचे संकट अधिक गडद झाले आहे खाजगी वाहनधारकांपेक्षा नोकरदार वर्गात समाविष्ट असलेल्या वाहनांनी आपले भाडे दर कमी करून खाजगी वाहनधारकांच्या तोंडचा घास हिसकावून घेतला असल्याचे खाजगी वाहनधारकांनी मत व्यक्त केले आहे तर सर्वसामान्य नागरिकांनी सुद्धा आपल्या घरी वाहन खरेदी केले असल्याने खाजगी वाहन भाडेतत्त्वावर मागणीत कमालीची घट निर्माण झाली आहे.

        आम्ही खाजगी वाहनधारक दिवसभर वाहन भाड्याची व पर्यटकांची वाट बघत असतो भाड्याची बोलणी सुरू असताना ग्राहक इतरत्र दराची विचारणा करीत असतो खाजगी वाहन सोडून उच्च पदस्थ व नोकरीत समाविष्ट असलेल्या वाहनधारकांसोबत चुकून बोलणी करतात त्यामुळे ते अति अल्प दर आकारून आमचे भाडे हिसकावून घेतात हे कितपत योग्य आहे उच्चपदस्थ व्यक्तींना व नोकरीवर समाविष्ट असलेल्यांना महिन्याकाठी भरमसाठ पगार मिळत असून सुद्धा स्वतःचे मालकीचे वाहन भाड्याने देऊन आमच्या हक्काचे भाडे स्वतः मारतात हे त्यांना अशोभनीय आहे,अशी व्यथा खाजगी वाहन धारकांनी व्यक्त करुन याची चौकशी व्हावी अशी मागणी केली.

अनंत देशमुख, विदर्भ संपर्क प्रमुख, संघर्ष वाहन चालक मालक संघटना महाराष्ट्र प्रदेश