नवेगांव खैरी पेच धरणाचे सर्व १६ वक्रद्वार उघडले…  – पेंच नदी पात्रात ६८१.५७२ क्युमेक्स विसर्ग सुरु,नागरिकांनी सावधगिरी बाळगावी..

 

कमलसिंह यादव 

तालुका प्रतिनिधी पारशिवनी..

पारशिवनी: – पारशिवनी तालुक्यातील नवेगाव खैरी पेंच धरणातील जलसाठ्यात दिवसेन दिवस वाढ होत असुन आज दुपारी१ वाजता पर्यंत धरणात एकुण १०० %  टक्के जलसाठा असुन मगलवार  दुपारी धरणाचे सर्व १६ वक्रद्वार उघडण्यात आले आहे .

     मागील काही दिवसा पासुन पावसाने विश्राम घेतला होता. बुधवार रात्रौ पासुन मध्यप्रदेशात पावसाने चांगलीच हजेरी लावली आहे.सतत होत असलेल्या पावसामुळे चौराई धरणाचे गेट उघडल्याने तोतलाडोह धरणातील जलसाठ्यात वाढ झाली आहे.

         यामुळे असल्याने सर्व १४ वक्रद्वार ०.३ मिटर ने ६८१.५७२ क्युमेक्स पाणी अजल बोगद्यातुन सोडण्यात येणाऱ्या पाण्याचा विसर्गामुळे पेंच नवेगांव खैरी धरणातील जलसाठ्यात आज शुक्रवार (दि.१५) ला  १२.०० वाजता पर्यंत एकुण १००% टक्के जलसाठा झाल्याने,दुपारी १ वाजता धरणाचे १६ वक्रद्वार ०.१५ मीटर ने उघडण्यात आले.

          त्यातून ६८१.५७२ क्युमेक पानी पेंच  नदी व कन्हान नदी पात्रात सोडण्यात शुरू झाला  आहे.सोडणारा विसर्ग जास्त करण्यात येऊ शकते. सध्या आज सकाळी पर्यत पारशिवनी तालुकात एकुण८५३.७५ मिमी पाऊत झाला यात पारशिवनी मंडळात ६४.२ मिमि कन्हान येथे ३४.० मि.मी. आमडी येथे ४७.१ मिमी तर नवेगाव खैरी येथे सर्वात जास्त म्हणजे ८१.० मिमी पाऊस झाला आहे आणी आता ही जोरदार पाऊस सुरु असुन

त्यामुळे पेंच नदी पात्राच्या  जलसाठ्यात वाढ होण्याची शक्यता वाढली असुन नागरिकांनी नदी पात्रा जवळ जाणे टाळावे,नदी काठच्या गावांना तसेच नदी पात्रातुन आवागमन करणाऱ्या सर्व संबंधितांनी स्वत ची काळजी घ्यावी असा सतर्कतेचा ईशारा देण्यात आला आहे.

          तसेच नागरिकांनी नदी पात्र ओलांडु नये,शेतीची अवजारे नदी पात्रात ठेऊ नये,जनावरांना नदी पात्र ओलांडु देऊ नये असे कडकडीचे आव्हाहन एन एस सावरकर उपविभागीय अभियंता तहसिलदार रणजीत दुसावार पेंच पाटबंधारे विभाग अभियंता व्हि डी दुपारे यांनी तालुका कृर्षी अधिकारी सुरज शेडें पंचायत समितीचे बिडीओ सुभाष जाधव यांनी सर्व संबंधित कर्मचारी याना केले असुन लोकांना सावध राहण्याचे आव्हान केले आहे .