नरसिंहपल्ली ग्रामपंचायतीवर राकॉचा झेंडा.. — पोटनिवडणुकीत विरोधक चारही मुंड्या चित..

 

डॉ.जगदिश वेन्नम

     संपादक 

सिरोंचा:- तालुक्यात नुकतेच पार पडलेल्या ग्रामपंचायत पोटनिवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला घवघवीत यश मिळाले असून नरसिंहपल्ली ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा झेंडा फडकला आहे.

      सिरोंचा तालुक्यात नुकतेच ग्रामपंचायत पोटनिवडणुक घेण्यात आले.आ.धर्मराव बाबा आत्राम यांच्या मार्गदर्शनात आणि राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष ऋतुराज हलगेकर तथा माजी जि प अध्यक्ष भाग्याश्री ताई आत्राम यांच्या नेतृत्वात ही निवडणूक लढविण्यात आली होती.यात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी समर्पित उमेदवार मोठ्या मताधिक्याने विजयी झाले असून नरसिंहपल्ली ग्रामपंचायतीवर एकहाती सत्ता बसविण्यात राकॉला यश आले आहे.

     नरसिंहपल्ली ग्रामपंचायतीच्या सरपंच पदी किष्टय्या पोरतेट,उपसरपंच पदी लसमय्या नलगुंठा विराजमान झाले.यावेळी राकॉचे तालुका अध्यक्ष मधुकर कोल्लूरी यांनी सरपंच,उपसरपंच आणि इतर सदस्यांचा पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.यावेळी राहुल पोगुला, श्रीनिवास कडार्ला,सतीश कडार्ला, लसमय्या बेझानी,सुरेश सुंकरी,रमेश तोटा,शंकर कोडावार आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

        माजी जि.प.अध्यक्ष तथा सिनेट सदस्य भाग्यश्री ताई आत्राम यांनी नवनियुक्त सरपंच,उपसरपंच आणि सदस्यांना शुभेच्छा देतांनाच मतदारांचेही आभार मानले. नरसिंहपल्ली गावकऱ्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर विश्वास ठेवून एकहाती सत्ता दिली आहे.गावाच्या विकासासाठी योग्य नियोजन करून नागरिकांच्या विश्वासाला तडा जाणार नाही याची दक्षता घ्या,असे सूचना दिले.तर ग्रामपंचायत अंतर्गत गावांत विकासात्मक कामासाठी निधी उपलब्ध करून देण्याची हमी त्यांनी दिली आहे.