Home Maharashtra पुणे इंटरनॅशनल स्कूलच्या विद्यार्थ्यांचे १२ वी ‘सीबीएससी’ परीक्षेत घवघवीत यश… —...

पुणे इंटरनॅशनल स्कूलच्या विद्यार्थ्यांचे १२ वी ‘सीबीएससी’ परीक्षेत घवघवीत यश… — चलवादी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ.हुलगेश चलवादींकडून विद्यार्थ्यांचे कौतुक….

दिक्षा कऱ्हाडे

वृत्त संपादिका 

    पुणे:- चलवादी शिक्षण संस्था संचलित पुणे इंटरनॅशनल स्कूल अँड ज्युनियर कॉलेजने २०२५-२६ च्या इयत्ता १२ वी सीबीएससी (विज्ञान शाखा) परीक्षेत यशाची परंपरा कायम राखली आहे. नुकत्याच जाहीर झालेल्या निकालात महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट कामगिरी करत संस्थेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. या परीक्षेत साग्निक कर याने ९४.६% गुण मिळवून महाविद्यालयात प्रथम क्रमांक पटकावला आहे.लक्ष्य वैश आणि पाखी प्रियंवदा या दोघांनी ९४.२% गुणांसह द्वितीय क्रमांक,तर हर्ष तराणी याने ९३.८% गुणांसह तृतीय क्रमांक पटकावला आहे.या सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.

       विद्यार्थ्यांचे हे यश त्यांच्या कठोर परिश्रमाचे आणि सातत्याचे फळ आहे.पुणे इंटरनॅशनल स्कूल अँड ज्युनियर कॉलेज केवळ अभ्यासावरच नाही,तर विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासावर भर देतो.या यशात शिक्षक आणि पालकांचाही मोठा वाटा आहे,अशी भावना विद्यार्थ्यांच्या यशाबद्दल बोलताना संस्थेचे अध्यक्ष डॉ.हुलगेश चलवादी यांनी व्यक्त केली.

       संस्थेच्या उपाध्यक्षा अँड.रेणुका चलवादी यांनीही विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.त्या म्हणाल्या,”मुले आणि मुली दोघांनीही परिक्षेत संपादन केलेले यश कौतुकास्पद आहे.दर्जेदार शिक्षण आणि शिस्त यांच्या जोरावर आमच्या विद्यार्थ्यांनी हे शिखर गाठले आहे.सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे आणि त्यांच्या पाठीशी उभे राहणाऱ्या पालकांचे त्यांनी अभिनंदन केले.

      विद्यार्थ्यांच्या या दैदीप्यमान यशात पुणे इंटरनॅशनल स्कूलच्या प्राचार्य स्मिता लोंढे,व्यवस्थापिका सायली शिंदे,उपप्राचार्य ज्योती सचदेवा यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.शिक्षिका अर्पिता रथ, श्रद्धा मोहिते,प्रियांका कांबळे,सीमा राठोड,रश्मी केशरवाणी,चैत्राली काकडे,संगीत शर्मा,जयंत निंबाळकर यांच्यासह सर्व कर्मचारी वृंदाने विद्यार्थ्यांच्या तयारीसाठी कठोर परिश्रम घेतले.वर्षभर शिक्षकांनी केलेले मार्गदर्शन,घेतलेली मेहनत आणि कर्मचाऱ्यांचे सहकार्य यामुळेच हे यश शक्य झाले असल्याचे संस्थेच्या वतीने सांगण्यात आले.