Home Political चिखलदरा तालुका काँग्रेस अल्पसंख्यांक विभागाच्या ब्लॉक अध्यक्षपदी समीर पठाण यांची नियुक्ती… ...

चिखलदरा तालुका काँग्रेस अल्पसंख्यांक विभागाच्या ब्लॉक अध्यक्षपदी समीर पठाण यांची नियुक्ती… — युवा नेतृत्वाला संधी,कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण…

अबोदनगो एस.चव्हाण 

अमरावती जिल्हा प्रतिनिधी

         दखल न्युज भारत

अमरावती :- चिखलदरा तालुक्यातील युवा व सामाजिक कार्यात सक्रिय असलेले समीर पठाण यांची चिखलदरा तालुका काँग्रेस कमेटी अल्पसंख्यांक विभागाच्या ब्लॉक अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या निवडीमुळे काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून विविध स्तरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

         समीर पठाण हे गेल्या अनेक वर्षांपासून सामाजिक, शैक्षणिक व जनहिताच्या प्रश्नांवर सक्रियपणे कार्यरत असून युवकांमध्ये त्यांची चांगली ओळख आहे. संघटनात्मक कामकाजात सातत्याने सक्रिय सहभाग, अल्पसंख्यांक समाजातील प्रश्नांबाबत संवेदनशील भूमिका तसेच पक्षाच्या विचारसरणीला बळकट करण्यासाठी केलेले कार्य लक्षात घेऊन पक्षश्रेष्ठींनी त्यांच्यावर ही महत्त्वाची जबाबदारी सोपविल्याचे बोलले जात आहे.

          त्यांच्या नियुक्तीनंतर तालुक्यातील काँग्रेस कार्यकर्ते, मित्रपरिवार व विविध सामाजिक संघटनांच्या वतीने त्यांचे स्वागत करण्यात आले. “युवा नेतृत्वाला संधी देण्याचा काँग्रेस पक्षाचा निर्णय कौतुकास्पद असून आगामी काळात संघटना अधिक मजबूत करण्यासाठी प्रयत्न करणार,” अशी प्रतिक्रिया समीर पठाण यांनी व्यक्त केली.

         दरम्यान, त्यांच्या नियुक्तीमुळे अल्पसंख्यांक समाजातील युवकांना राजकीय व सामाजिक क्षेत्रात नवीन दिशा मिळेल, असा विश्वास कार्यकर्त्यांनी व्यक्त केला आहे.