प्रेम गावंडे
उपसंपादक
चंद्रपूर, दि. १४ मे २०२६ : येत्या पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर शहरात पावसामुळे नागरिकांना कोणतीही अडचण निर्माण होऊ नये यासाठी चंद्रपूर शहर महानगरपालिकेच्या वतीने आज दिनांक १४ मे २०२६ रोजी महापौर सौ.संगीता राजेंद्र खांडेकर यांच्या अध्यक्षतेखाली मान्सून पूर्व तयारीबाबत आढावा बैठक घेण्यात आली.
सदर बैठकीस महानगरपालिकेचे उपायुक्त प्रशांत दानव,स्थायी समिती अध्यक्ष मनस्वी गिरे,आयुक्त अकूनूरी नरेश,उपायुक्त संदिप चिद्रावार व शेषराव टाले,तिन्ही झोनचे सहायक आयुक्त,स्वच्छता वैद्यकीय अधिकारी अमोल शेळके,शहर अभियंता महेंद्र हजारे,सर्व स्वच्छता निरीक्षक,तसेच शिक्षण विभाग,विद्यूत विभाग,आरोग्य विभाग,अतिक्रमन विभाग चे विभागप्रमुख उपस्थित होते.
या बैठकीत शहरातील नाले व गटारांची साफसफाई,पावसाचे पाणी साचणाऱ्या ठिकाणांची पाहणी,रस्त्यांची दुरुस्ती,पावसाळ्यात आवश्यक असलेली यंत्रणा व मनुष्यबळ सज्ज ठेवणे यासंदर्भात सविस्तर आढावा घेण्यात आला.
यावेळी महापौर सौ.संगीता राजेंद्र खांडेकर यांनी संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांना मान्सूनपूर्व सर्व कामे वेळेत व दर्जेदार पद्धतीने पूर्ण करून पावसाळ्यात नागरिकांना कोणतीही अडचण होणार नाही याची दक्षता घ्यावी,अशा सूचना दिल्या.



