जामा मस्जिदच्या समोर मुस्लिम बांधवाकडुन बौद्ध बांधवाना शरबत वितरण… 

 

    राकेश चव्हाण

कूरखेडा तालुका प्रतिनिधी 

            डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा जयंती निमीत्य रविवार रोजी रात्री समस्त बौद्ध समाज मंडळाच्या वतीने शहरात वाजत गाजत भव्य मिरवणूक काढण्यात आली. यावेळी मिरवणूक येथील जामा मस्जिद समोर पोहचताच बौद्ध समाज बांधवांचे येथील मुस्लिम समुदायाचा वतीने स्वागत करण्यात येत जयंतीचा शूभेच्छा देण्यात आल्या व त्याना शरबतचे वितरण करण्यात आले.

            शहरात सर्वधर्म समभावाची जूनी परंपरा आहे येथील हिंदू, मुस्लिम, बौद्ध नागरीक नेहमीच एकमेकांचा सूख दूखात तसेच सन समारंभात सहभागी होत असतात.

            रात्री मस्जिद समोर आयोजित शरबत वितरण कार्यक्रमात मुस्लिम समाज मंडळाचे अध्यक्ष मसूद शेख,आसिफ शेख,साजीद शेख, उस्मान खान, शमीम शेख,शादाब खान,जमील शेख,जिया सय्यद, सोहेल पठान,फाजील शेख,फैजान शेख, बंटी जमील, फ़ीरोज़ ख़ान,जामीन कूरेशी,मूजाहीद शेख,नावेद शेख,जमीर कूरेशी,सादिक शेख,रेहान खान,मीजान शेख, मून्ना शेख, सलमान पठान, तौकीर शेख,मोनू पठान, फ़ीरोज़ शेख व मोठ्या संख्येत मुस्लिम बांधव उपस्थीत होते.