जेएसपीएम महाविद्यालय धानोरा येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी… 

भाविक करमनकर

धानोरा तालुका प्रतिनिधि 

दिनांक 14 एप्रिल 2024 ला डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी जे एस पी एम महाविद्यालयात साजरी करण्यात आली.

         यावेळेस कार्यक्रमाला अध्यक्ष प्राध्यापक ज्ञानेश बनसोड तर प्रमुख पाहुणे म्हणून प्रा. भाविकदास करमनकर उपस्थित होते.

        कार्यक्रमाची सुरुवात डॉ.आंबेडकर यांच्या प्रतिमेला पूष्पमाला अर्पण करून करण्यात आली.  या कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानावरुन प्राध्यापक ज्ञानेश बनसोड यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याचा गौरव करत व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी मतदानाचा अधिकार दिला.

          तसेच स्त्रियांना भरपगारी रजा दिली हिंदू कोडं बिल दिल असे यावेळी सांगितले यावेळी भास्कर वाढनकर बालाजी राजगडे उपस्थित होते.