बाळासाहेब सुतार
निरा नरसिंहपुर प्रतिनिधी….
पिरसाहेब यात्रा उत्सवानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या निकाली कुस्त्यांच्या फडाला मोठा प्रतिसाद मिळाला.
कुस्ती आखाड्याचे पूजन महाराष्ट्र केसरी किताबाचे मानकरी मल्ल सम्राट रावसाहेब मगर (आप्पा) व पिरसाहेब यात्रा कमिटीच्या वतीने श्रीफळ फोडून निकाली कुस्त्याला प्रारंभ झाला.
पिंपरी बुद्रुक (तालुका) इंदापूर येथील भागाचे ग्रामदैवत पिरसाहेब मंदिर यात्रा (उरूस) सालाबाद प्रमाणे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यात्रे निमित्त निकाली कुस्त्याचे जंगी मैदानही भरविण्यात आले.
पुणे,सोलापूर,सातारा,सांगली,आधी सर्व जिल्ह्यातून हजारो कुस्ती मल्ल पैलवान यांची उपस्थिती लाभल्याने निकाली कुस्त्याला चांगलाच रंग आला.
एक नंबरची कुस्ती पैलवान आजय राजमाने (टाकळी) विरुद्ध पैलवान भैय्या धुमाळ यांची इनाम रुपये २५ हजाराची कुस्ती लावण्यात आली. या मध्ये आजय राजमाने यांनी दणदणीत विजय मिळवला.
पारंपरिक पद्धतीने कुस्त्यांचा थरार रंगला. लहान गटांपासून ते नामांकित मल्लांपर्यंत ३५० हुण अधिक निकाली कुस्त्या लावण्यात आल्या.
कुस्ती आखाड्यामध्ये अनेक कुस्त्या रंगल्या प्रत्येक कुस्तीमध्ये खेळाडूंनी जोरदार खेळ दाखवित. प्रेक्षकांची मने जिंकली.५० रुपयांपासून ते २५ हजार रुपयांपर्यंत आकर्षक बक्षिसे देण्यात आली.
त्यामुळे कुस्ती शौकिन मल्लांमध्ये विशेष उत्साह पाहावयास मिळाला.कुस्ती आखाड्यासाठी पंच म्हणून सुनील बोडके, व्यंकट बोडके, आशोक वाळेकर, राजेंद्र मगर, निलेश बोडके, बंटी काटकर, राजेंद्र शेलार, दिलीप बोडके, ज्ञानदेव बोडके, नवनाथ वाळेकर, दादाभाई शेख, अभिजीत भंडलकर, वैभव पडळकर, आधी सर्वांनी काम पाहिले.
यात्रा उत्सवाच्या निमित्ताने भरविण्यात आलेल्या कुस्त्यामुळे परिसरात उत्सवी वातावरण निर्माण झाले असून कुस्तीप्रेमींना पारंपरिक खेळाचा मनसोक्त आनंद घेता आला.
पिरसाहेब यात्रा उत्सव व कुस्ती आखाड्याचे संपूर्ण कामकाज सरपंच, उपसरपंच, आजी-माजी सरपंच, पोलीस पाटील, तंटामुक्ती अध्यक्ष, विविध संस्थांचे अध्यक्ष व आजी-माजी चेअरमन, तरुण कार्यकर्ते, पिरसाहेब यात्रा कमिटी व समस्त ग्रामस्थ पिंपरी बुद्रुक यांनी पाहिले कुस्ती आखाड्यामध्ये जोडण्याचे काम महाराष्ट्र केसरी मल्ल सम्राट रावसाहेब मगर (आप्पा) पाहिले तर निवेदक म्हणून पैलवान युवराज केचे व ह भ प महेश सुतार यांनी काम पाहिले.
मानाच्या घोड्याची मंदिर प्रादक्षिणा व पूजा केल्यानंतर सर्वांना महाप्रसाद देऊन यात्रेची सांगता झाली.


