Home देशविदेश अद्वैत,द्वैत आणि द्वंद्व…

अद्वैत,द्वैत आणि द्वंद्व…

           अद्वैत आणि द्वैत हे दोन शब्द विचार आणि भावनेशी संबंधित आहेत, द्वैतभाव म्हणजे दुजा भाव. अद्वैताला द्वैत म्हणणे म्हणजेच एक आहे त्याला दोन म्हणण्यासारखे आहे, खरे तर एक आणि दोन याच्यामध्ये फरक आहे, एक म्हणजे दोन नव्हे आणि दोन म्हणजे एक नव्हे. संख्यात्मक विचार केला तर एक दोन तीन आणि अनेक अशी संख्या असू शकते, माणूस एकच. पण एकच असलेल्या माणसांची संख्या अनेक असू शकते, पण माणूस म्हणून हा एकच असतो. माणूस तो माणूसच दोन माणसात फरक राहू शकत नाही, संख्यात्मक फरक असतो परंतु गुणात्मक फरक नाही. अगदी असेच पशु पक्षी वृक्ष इत्यादी जीव प्राण्यांचे आहे. त्यांचा गुणात्मक विचार केला तर तेथे द्वैत नाही अद्वैतच आहे. परंतु मोजायचे म्हटले तर तिथे द्वैत होऊ शकते. परंतु द्वैत किंवा अद्वैत हा शब्द भावनेशी आणि विचाराशी संबंधित आहे संख्येशी नाही. जीवसृष्टीतील जीवांचे अनेक प्रकार चे जीव हे अद्वैतच आहेत. तरीही पशु पक्षी आणि वृक्ष यांच्या अवयवावरून त्यांच्यामध्ये अनेक जाती निर्माण झाल्या, त्या जात जातींची संख्या म्हणजे द्वैत होऊ शकते, तरीपण त्यात दुजाभाव नाही म्हणजे द्वेत भावना नाही म्हणजेच अद्वैत भावना आहे, अद्वैत भावना म्हणजेच प्रेमाची भावना आपुलकीची भावना जवळकीची भावना एकत्वचि भावना होय. अद्वैत भावना म्हणजे समतेची भावना, पवित्र भावना होय, आणि द्वैतभावना म्हणजे विषमतेची भावना आणि अपवित्र भावना होय. ज्या भावनेत राग द्वेष लोभ मोहम्मत अहंकार अशा विकृत म्हणजे दुर्गुणी गोष्टी असतात त्या भावना म्हणजे द्वेत भाव किंवा देत भावना होत, अशा द्वेत भावनेतूनच विषमता निर्माण झाली, 

     जाती आणि त्यातील द्वेष द्वेष मत्स्यर, अभिमान तसेच धर्म आणि त्यातील द्वेष मत्सर अभिमान, वर्ग आणि त्यातील द्वेष मत्सर अभिमान म्हणजेच द्वैतभावना होय. 

      द्वंद्व याचा अर्थ मतभेद भांडण संघर्ष युद्ध. माणूस संस्कार सोडून विकृत झाला की त्यात अनेक कु विचार निर्माण होतात, आपली माणसे आपली वाटत नाहीत, दुरावा निर्माण होतो, स्वार्थ आणि मोहातून आणि अभिमानातून तुझ्या भाव किंवा द्वैतभाव निर्माण होतो त्यामुळे माणसा माणसात द्वंद्व होते. माणूस बेसुमार बनून भांडणे मारामाऱ्या करायला लागतो, त्याच्या बुद्धीवरचा ताबा सुटतो, सॅम उपचाराची भावना नष्ट होते, दया क्षमा शांती नाहीशी होते, तो तडजोड करायला तयार होत नाही, म्हणून दोन व निर्माण होते. आणि त्याचे परिणाम त्याला भोगावे लागतात, म्हणजेच नुकसान करून घेत असतो. 

    येथील आर्थिक सामाजिक विषमता ही द्वैत भावनेतूनच निर्माण झालेली आहे, अनेक जाती अनेक धर्म अनेक वर्गाची ही समाजव्यवस्था म्हणजेच द्वैत व्यवस्था आणि द्वैत भावनेचे हे लक्षण आहे. आपण मानव जातीचे असून माणसाने माणसाबरोबर माणसासारखी वागले पाहिजे, एक दुसऱ्याचा विचार केला पाहिजे एकमेकांनी सहकार्याची भावना ठेवली पाहिजे, इतरांचे सुख तेच माझे सुख आणि इतरांचे दुःख तेच माझे दुःख अशी भावना ठेवणे म्हणजे अद्वैत होय. संस्कारातून माणूस सद्गुनी होतो, सदगुणामुळे द्वैतभावना नाहीशी होते, स्वार्थ लोभ आणि दुराभिमान नाहीसा होतो, माणसात समतेची भावना निर्माण होते, आणि विषमता नाहीसे होते, विषमतेची व्यवस्था नष्ट होऊन समताधिष्ठित समाज रचनेची स्थापना होणे म्हणजेच अद्वैत समाज निर्माण होणे होय. समतेच्या व्यवस्थेतच अद्वैत समाज नांदू शकतो. निर्माण ही होऊ शकतो. त्यासाठी जातीव्यवस्था वर्ग व्यवस्था आणि धर्मांधता नष्ट करणे आवश्यक आहे. असे झाले तर प्रत्येक माणसातील द्वैत भावना नष्ट होऊन अद्वैत भावना मजबूत होईल त्यामुळे द्वंद्व आणि त्याला संधीच मिळणार नाही. समतेची ही व्यवस्था आपण कशी आणायची यावर विचार होणे गरजेचे आहे. 

       लेखक : दत्ता तुमवाड

          सत्यशोधक समाज नांदेड

दिनांक : 15 जानेवारी 2026, फोन : 9420912209.