नियतीताई शिंदे राजमाता जिजाऊ गौरव पुरस्काराने सन्मानित… 

दिनेश कुऱ्हाडे

    उपसंपादक

आळंदी : राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीच्या निमित्ताने स्वामी विवेकानंद प्रतिष्ठान आणि माय होम इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कार्यक्रमात विविध क्षेत्रात कार्य करणाऱ्या कर्तृत्ववान महिलांना राजमाता जिजाऊ गौरव पुरस्काराने देऊन गौरविण्यात आले यामध्ये आळंदी येथील नियती फौंडेशनच्या अध्यक्षा नियतीताई शिंदे यांना सुद्धा राजमाता जिजाऊ गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. 

             माय होम इंडियाचे संस्थापक सुनील देवधर यांच्या संकल्पनेतून संपन्न झालेल्या या पुरस्कार सोहळ्यात वेळी व्यासपीठावर राम मंदिर निर्माण आंदोलनाच्या अग्रणी नायिका साध्वी ऋतंभरा, स्वामी जितेन्द्रानंद सरस्वती, पुणे भाजपचे शहराध्यक्ष धीरज घाटे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

               नियती शिंदे यांनी गेल्या ५ वर्षांपासून आळंदी येथे नियती फौंडेशनच्या माध्यमातून विविध सामाजिक विषयांवर आवाज उठविला आहे तसेच निराधार वृद्धांना जगण्याची उमेद निर्माण व्हावी यासाठी मातोश्री वृद्धाश्रमाची स्थापना केली आहे. शंभरहून अधिक निराधार वृद्धांना त्यांनी या आश्रमात आधार दिला आहे. त्यांच्या या कार्याची दखल घेऊन त्यांना राजमाता जिजाऊ गौरव पुरस्काराने गौरविण्यात आले असल्याचे आयोजक सुनील देवधर यांनी सांगितले आहे.