कुरखेडा : घाटी येथे गाव गणराज्य शिलालेख १९ व्या वर्धापन दिनानिमित्त विविध कार्यक्रम…

    राकेश चव्हाण

कुरखेडा तालुका प्रतिनिधी 

          कुरखेडा तालुक्यातील घाटी येथे शुक्रवार १२ जानेवारी रोजी गाव गणराज्य शिलालेख १९ वा वर्धापन दिनानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

       यावेळी सकाळी ७ वाजता ग्रामसफाई करण्यात आली,त्यानंतर गावातून राष्ट्र‌संत तुकडोजी महाराजाची पालखी काढण्यात आली. त्यानंतर शिलालेखाचे विधिवत पुजन सरपंचा मोहिनी गायकवाड, गाव गणराज्य अध्यक्ष पितांबर ठलाल, सचिव मनोज लाडे, उपसरपंच फाल्गुन फूले, गुरुदेव सेवा मंडळ अध्यक्ष रुपचंद दखणे, सचिव देवराव ठालाल, नथ्थुजी दखणे महाराज, लक्ष्मणजी बावणे महाराज, देवरावजी मेश्राम यांच्या हस्ते पुजन करण्यात आले. त्यानंतर दुपारी १२.०० वाजता भजन व किर्तनाचा कार्यक्रम घेण्यात आला. दुपारी १.०० वाजतापासून प्रबोधन व मार्गदर्शन कार्यक्रमाला सुरवात करण्यात आली.

          याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून पितांबर ठलाल होते तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून आमदार कृष्णा गजबे, कुरखेडाचे सामाजिक कार्यकर्ते व गड.विश्व.चे सम्पादक/ पत्रकार नासीर हाशमी, श्री देवेागुरु आत्मानुसंधान अड्याळ टेकडी उपस्थित होते.

           मार्गदर्शन करताना आमदार गजबे यांनी ‘गाव करी ते राव न करी’ या म्हणी प्रमाणे गावच्या ग्रामसभेचे महत्व, आमसभेचे अधिकार, आपला गाव आपले राज्य, माता जिजाऊचे विचार, स्वामी विवेकानंदाचे कार्य खुप सुंदर व चांगल्या प्रकारे समजावून सांगीतले त्याच प्रमाणे नासीर हाशमी यांनी जल, जंगल, जमीनीचे अधिकार, जाती धर्मामधील भेदभाव, ग्रामसभेचे अधिकार आणि हक्क, ग्रामगीता याविषयी मार्गदर्शन केले. उपसरपंच फाल्गुन फुले यांनी घाटी ग्रामसभेचे अधिकार, ग्रामसभेच्या परवानगीशिवाय कोणताच विभाग काम करु शकत नाही व गावचा विकास करायचा असेल तर कोणताही पक्ष न पाहता चांगल्या व्यक्तीची निवड करायला पाहिजे असे मार्गदर्शन केले.

           भारतीय संविधान कलम 47 व 73 व्या घटना दुरुस्ती नुसार अनुसुचित क्षेत्रासाठी 24/12/1996 नुसार ग्राममसभेस मिळालेले अधिकार व वनहक्क कायदा 2006, 2008, 2012 नुसार मिळालेले अधिकार याचा पुरेपुर उपयोग घाटी ग्रामसभा करीत आहे.

          सदर कार्यक्रमाला संपूर्ण गावकरी, महिला, गावातील अधिकारी, कर्मचारी, सर्व समित्यांचे सदस्य उपस्थीत होते. कार्यक्रमाचे संचालन तंठामूक्ती अध्यक्ष दुलाराम नाकाडे, तर आभार पोलीस पाटील सुरजजी टेकाम यांनी मानले.