पारशिवनी येथे अवैधरित्या वाळुची वाहतुक करणारे टॅक्टर जप्त. — मंडळ अधिकारी महशुल पथकाची कार्यवाही. — महा.जमिन नियमानुसार चालक-मालकांवर कार्यवाही ..

    कमलसिंह यादव 

तालुका प्रतिनिधि पारशिवणी

कन्हान : – पारशिवनी शहर येथे तहसीलदार यांच्या महशुल पथकाने बिन परवाना अवैध वाळुची वाहतुक करणाऱ्या टॅक्टरला पकडुन दंड लाऊन टॅक्टर जप्त केला.

        टॅक्टर तहसिल कार्यालय येथे अटकवून ठेवण्यात आले. टँक्टर मालक व चालक दोन्ही राहणार पारशिवनी यांचेवर कायदेशीर कारवाई केली.

       पारशिवनी तहसिलदार राजेश भंडारकर यानी नविन महशुल पथक स्थापन केले असून सदर पथकाने पहिल्याच दिवशी दनका देत वाळू चोरांचा बंदोबस्त करणे सुरू केले.

           मोहिम अंतर्गत चालक मालक राहणार पारशिवनी याचे विरुद्ध महाराष्ट्र जमिन अधिनियम १९६६ चा कलम ४७ ( ८) ,(२) अन्वये कार्यवाही करण्यात आली.

    प्राप्त झालेल्या माहिती नुसार आज (दि.१४) ला सकाळी पाहाटेच्या दरम्यान तहसील कार्यालय महशुल पथकाचे मंडळ अधिकारी घुळे,तलाठी महेन्द शिरसागर,तलाठी शेख जमिल याचे पथक पारशिवनी शहरात होत असलेली बाळु चोरीची रोकथाम करिता शहरातील  परिसरात पेट्रोलिंग करीत असतांना गुप्त बातमीदारा कडून माहिती मिळाली कि पारशिवनी शहरात टॅक्टर बाळु घेऊन येत आहे.

        त्यात अवैधरित्या विनापरवाना वाळुची वाहतुक करीत असल्याबाबत मिळालेल्या माहिती वरुन तहसीलच्या महसुल पथकचे मंडळ अधिकारी घुळे, तलाठी महेन्द क्षिरसागर,तलाठी शेख जमिल यानी टँक्टर क्रमांक एम.एच. ४०/२३२६  येत असतांना दिसून आला.

           महसुल पथकाचे मंडळ अधिकारी व तलाठी यानी त्यास थांबवून परिचय देऊन टॅक्टरची पाहणी केली असता वाळु दिसुन आली.महसुल पथकानी टॅक्टर चालका व मालकाला वाळू बाबत राॅयल्टी विचारली,मात्र त्यांच्याकडे रायल्टी नसल्याचे आढळून आले.