युवकास सतुरने मारून केले गंभीर जख्मी..

 

     कमलसिंह यादव 

तालुका प्रतिनिधी पारशिवनी..

 

पारशिवनी : – पोलीस स्टेशन अंतर्गत पालोरा येथे शुल्क कारणाने शेतकरी रितेश कामडे व पुतण्या चेतन कामडे यास आरोपी प्रदीप कामडे यांनी गच्ची पकडली व शिविगाळ करून भांडण केले.

       तर मुलगा उमेश कामडे यानी चेतन कामडेला सतुर ने मारून गंभीर जख्मी केल्याने फिर्यादी रितेश कामडेच्या तक्रारीवरुन पारशिवनी पोलीसानी आरोपी विरूध्द गुन्हा दाखल केला.गुन्हा दाखल होताच पोलीसांनी पुढील तपास करित आहे. 

            शेतकरी रितेश माधवराव कामडे हे पारशिवनी तालुक्यातील मौजा पालोरा येथे परिवारासह राहतात.त्यांचा चुलत भाऊ गजानन आनंदराव कामडे हा सुध्दा त्यांचे परिवारासह घराशेजारी राहतो. 

         शुक्रवार (दि.१३) ऑक्टोंबरला दुपारी १.३० वाजता गावातील प्रदीप धनराज कामडे याने पुतण्या चेतन गजानन कामडे यास,विनाकारण शिविगाळ करून भांडण करित असल्या बाबत पुतण्याने रितेश कामडेला फोन करून सांगितल्याने रितेश व पुतण्या चेतन सह प्रदीप कामडे यांचे घरी विचारणेसाठी गेले असता प्रदीप कामडे यांनी तु कोण होते विचारणार असे म्हणुन रितेश व पुतण्या चेतन याची गच्चीला पक डले व तुम्हाला दाखवु का,असे म्हणुन त्याचा मुलगा उमेश कामडे यास घराबाहेर बोलाविल्याने त्याने घरातील सतुर हातात घेवुन धावत आला व चेतन कामडे यास तुला जीवे मारतो म्हणुन जीवे मारण्याचा इराद्याने पाठीमागुन येवुन कंबरेखाली डाव्या ढुंगंणावर (पुठ्ठ् यावर) सतुर ने वार करून गंभीर जख्मी केले.

          त्यावेळी गावातील सागर दिनकर गीरडकर व भुषण फुलचंद चकोले हे हजर होते.त्यांनी उमेश व त्याचे वडील प्रदीप कामडे यांना बाजुला केले व जख्मी चेतन यास उपचार कामी सरकारी हॉस्पीटल पारशिवनी येथे नेवुन भर्ती केले, त्याचा उपचार सुरू आहे. 

           पारशिवनी पोलीसानी आरोपी विरूध्द कलम ३०७, ५०४, ३४ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.