युगपर्वतक डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी संपूर्ण समाजाला न्याय देण्याचे काम केले केले-डॉ.सतिश वारजूकर..

 

तालुका प्रतिनिधी..

     चिमूर:-

           धम्मचक्र प्रवर्तन दिन’ हा भारतात साजरा केला जाणारा महत्वाचा उत्सव आहे.या दिवशी महाराष्ट्रासह देशभरातील लाखो अनुयायी नागपूरला येतात.१४ ऑक्टोबर १९५६ रोजी दीक्षाभूमी,नागपूर इथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या अनुयायांसोबत बौद्ध धम्माची दिक्षा घेतली व धम्मचक्र गतीमान केले.तेव्हापासून हा दिवस ‘धम्मचक्र प्रवर्तन दिन’ म्हणून साजरा केला जातोय अश्या प्रकारची माहिती डॉ.सतिश वारजूकर यानी उपस्थितांना दिली.

     आज चिमूर तालुक्यातील बौद्धपंच कमिटी दाबका हेटी येथे सामूहिक बौद्ध वंदना घेण्यात आली व धम्म चक्र परिवर्तन दिनाच्या निमित्त ध्वजारोहन करण्यात आले.याचबरोबर कार्यक्रमाप्रसंगी मान्यवरांनी उपस्थितीत्यांना मार्गदर्शन केले.

           धम्मचक्र परिवर्तन दिनाच्या निमित्ताने,७४ चिमूर विधानसभा क्षेत्राचे समन्व्यक तथा उपाध्यक्ष ओबीसी महासंघ महाराष्ट्र प्रदेश डॉ.सतिश वारजूकर,माजी उपसभापती पंचायत समिती चिमूर तथा अध्यक्ष युवक कांग्रेस चिमूर विधानसभा रोशन ढोक,माजी पंचायत समिती सदस्य भावना बावनकर,कोटगाव ग्रामपंचायतचे सदस्य उपक्षम रामटेके,कांग्रेस कार्यकर्ते दिलीप समर्थ,कवडुजी समर्थ,संबाजी सूर्यवंशी,हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

          कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सागर राऊत,प्रणाली मेश्राम,सारिका राऊत,स्वप्नील खोब्रागडे,सुनंदा खोब्रागडे,बुद्धगया राऊत,अजित रामटेके,व आदी बौध्द उपासक व उपासिका यांनी विशेष परिश्रम घेतले..