शुभम गजभिये
विशेष प्रतिनिधी..
चिमूर तालुकातंर्गत मौजा नेरी येथे बँक ऑफ इंडिया ची शाखा आहे.नेरी येथे एकमेव राष्ट्रीयीकृत बँक आहे.येथे अनेक गावचे खातेदार आहेत.१३ मे ला बँकेची लींक फेल होती.त्यामुळे येथील सर्व व्यवहार बंद होती.त्यामुळे खातेदारांची सर्व महत्वाची कामे अडली आहेत .
या शाखेशी अनेक गावचे खातेदार जुळलेली आहेत.नेरी परीसरात कुठेही राष्ट्रीय बँक नाही.त्यामुळे इथे मुलांचे शीष्यवृत्ती साठी खाते आहेत . धानाचे व्यापारी,घरकुल लाभार्थी,बचत गट,अन्य व्यवहार या शाखेत चालतात.त्यामुळे खातेदारांची संख्या जास्त आहे.
या शाखेत बँक पासबुक एंट्री करून मीळत नाही.येथील अधीकारी खातेदाराला ईकडे – तीकडे नाचवतात.खातेदाराला या अधीकाऱ्याकडुन सभ्य पणाची वागणुक मीळत नाही.
१३ मे ला बँकेची लींक फेल होती.त्यामुळे अनेक खातेदाराची महत्वाची कामे अडली.पैशा अभावी कुणाचा वैद्यकीय उपचार,लग्न समारंभ,विविध या लींक फेलमुळे अडली.खातेदार बँकेत येऊन परत गेली.
यामुळे बँकेच्या कर्मचाऱ्यांनी लवकरात लवकर बँकेची कामे सुरळीत चालू करून खातेदारांना दीलासा द्यावा अशी मागणी खातेदाराची आहे.



