शुभम गजभिये..
विशेष प्रतिनिधी..
गडचिरोली जिल्हातंर्गत कोरची तालुक्यातील मौजा भिमपूर येथे तथागत भगवान गौतम बुद्धांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.
यावेळी अखिल भारतीय बौद्ध महासभा शाखेचे अध्यक्षा सविता जांभुळकर,अखिल भारतीय बौद्ध महासभा शाखेचे सचिव कैलास अंबादे,या मान्यवरांनी भारतरत्न महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर तथा तथागत भगवान गौतम बुध्द यांच्या प्रतिमेंला पुष्पहार अर्पण केले.
सदर मान्यवरांनी मार्गदर्शन केल्यानंतर उपस्थित बौद्ध उपासक – उपासिका यांना खिर दान करण्यात आले.जयंती दिनानिमित्तच्या कार्यक्रमाप्रसंगी उपासक-उपासिका आवर्जून उपस्थित होते..



