Home Social वामनराव पाटील स्मृती प्रतिष्ठान संस्थेच्या पदाधिकाऱ्यांकडून प्रथम क्रमांक पटकाविलेल्या बुध्द विहाराला विशेष...

वामनराव पाटील स्मृती प्रतिष्ठान संस्थेच्या पदाधिकाऱ्यांकडून प्रथम क्रमांक पटकाविलेल्या बुध्द विहाराला विशेष दान… — इतर बुध्द विहाराला पुस्तके दान…

शुभम गजभिये 

विशेष प्रतिनिधी..

चिमूर(ता.प्र.):- बुद्धविहार ही भगवान बुद्ध आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना अभिप्रेत असणारी धम्म चळवळीची केंद्रे व्हावी,या विहारांमधून सामाजिक चळवळीचे कार्य सातत्याने होत राहावे,या उद्देशाने चिमूर तालुक्यातील बुद्धविहारांकरिता चक्रवर्ती सम्राट अशोक आदर्श बुद्धविहार स्पर्धेचे आयोजन वामनराव पाटील स्मृती प्रतिष्ठान या संस्थेकडून करण्यात आले होते.

        या स्पर्धेकरिता बुद्धविहार समित्यांकडून अर्ज मागविण्यात आले.तालुक्यातील 70 बुद्धविहारांनी या स्पर्धेत उत्स्फूर्तपणे सहभाग दर्शविला.

        संस्थेने या स्पर्धेत सहभाग घेणाऱ्या बुद्धविहारांना प्रत्यक्ष भेट देत बुद्धविहार समिती सदस्यांसोबत संवाद साधत बुद्धविहारांचे मूल्यांकन केले.

          स्पर्धेत प्रथम क्रमांक प्राप्त विहाराला 10 हजार रुपये रोख,10 हजार रुपयांचा एक संगणक आणि 5 हजार रुपयांची पुस्तके भेट देण्यात येणार आहे.विशेष उल्लेखनीय बाब असणाऱ्या बुद्धविहारांना विविध पुरस्कार देण्यात येणार आहेत.

        या बाबतची माहिती वामनराव पाटील स्मृती प्रतिष्ठानचे अध्यक्ष अॅड. भूपेश पाटील,सचिव सुरेश डांगे,सदस्य हरी मेश्राम,रामदास कामडी,वीरेंद्र बन्सोड,सुधाकर गणवीर,प्रियानंद गेडाम,नितीन पाटील यांनी दिली आहे.