शुभम गजभिये
विशेष प्रतिनिधी…
चंद्रपूर जिल्हातंर्गत चिमूर तालुक्यात तेंदूपत्ता तोडण्याचे काम कंत्राटदारांचे माध्यमातून सुरु आहे.यामुळे ग्रामीण भागातील मजूर हे तेंदूपत्ता तोडण्यासाठी जंगलात जातात.
चिमूर तालुक्यातील मौजा करबडा येथील सौ.कचराबाई अरुण भरडे पतीसोबत आज सकाळी वनविभागाच्या कं.झो.८६२ मध्ये तेंदूपत्ता संकलनासाठी गेल्या होत्या.
झुडपात दबा धरून बसलेल्या वाघाने सौ.कचराबाई भरडे यांच्यावर हल्ला केला व शंभर मीटर पर्यंत तिला ओढत नेले.यातच सौ.कचराबाई भरडे यांचा मृत्यू झाला.तेंदूपत्ता संकलनासाठी गेलेल्या मजूरांनी आरडाओरड केल्याने वाघ पळून गेला.
मात्र,पती समोर पत्नीचा अनपेक्षित पत्नीचा मृत्यू वाघाच्या हल्यात होत असेल तर त्या पतीचे मन किती खिन्न होत असेल याची कल्पना करता येत नाही.
तेंदूपत्ता संकलनासाठी गेलेल्या सौ.कचराबाई भरडेंचा मृत्यू वाघाच्या हल्यात झाल्याची बातमी पळसगाव वनपरिक्षेत्राधिकारी यांना कळताच त्यांची चमू घटनास्थळावर पोहची व घटना स्थळाचा पंचनामा केला.
पुढील कायदेशीर कारवाई व प्रक्रिया वनविभागाच्या चमूने सुरू केली आहे.
मृतक सौ.कचराबाईच्या पश्चात पती,मुलेमुली असा परिवार आहे.



