डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंतीदिनी काँग्रेसचे रक्तदान शिबीर.

 

युवराज डोंगरे/खल्लार

डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 132 व्या जयंतीदिनी तालुका ग्रामीण व शहर काँग्रेसच्या कमिटीच्यावतीने डॉ.सदानंद बर्मा ब्लॅड बँक येथे काँग्रेस तालुका अध्यक्ष नामदेव तनपुरे, जय घोरे, धम्मानंद देवडेकर, योगेश दुबे व प्रवीण हूडयांच्यासह इतर काँग्रेस कार्यकर्त्यांनी रक्तदान करीत तसेच आठवडी बाजार येथील विहारात जावून डॉ. बाबासाहेबांच्या प्रतिमेला हार अर्पण करून सर्वांनी अभिवादन केले. 

    यावेळी नामदेवराव तनपुरे, श्रीकांत झोडपे, सागर व्यास, दिनेश वानखडे, सुनील तायडे, राहुल गाठे,संजय शेटे,अशोक दाणे, योगेश दुबे,हरिदास दाभाडे, राम उखळकर,धम्मानंद देवडेकर, प्रमोद कांबळे, बाळा शिरसुद्दे, धीरज आपले,प्रवीण हूड, अकबरभाई,अनिसभाई दर्याबादी,सचिन पातोंड, सईदभाई,दिनेश पातोंड,पवन पातोंड,प्रमोद दाभाडे, श्रीकृष्ण सरदार,गौतम सरदार,सचिंद्र बेलसरे,विशाल खानझोडे, जय घोरे,गौरव साबळे, विलास मालखेडेसह काँग्रेस कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.