दिनेश कुऱ्हाडे
प्रतिनिधी
आळंदी : भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आळंदीत भारतीय जनता पक्षाच्या वतीने साजरी करण्यात आली. यावेळी भाजपचे नेते डॉ.राम गावडे आणि शहराध्यक्ष किरण येळवंडे यांनी डॉ.आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार व फुले अर्पण करुन अभिवादन केले.
यावेळी माजी प्राचार्य नानासाहेब साठे, माजी नगरसेविका सुनिता रंधवे, रुक्मिणी कांबळे, किरण मुंगसे, नाना झोंबाडे, बंडुनाना काळे, रविंद्र रंधवे, संदीप रंधवे, शामराव गिलबिले, अमोल विरकर, आकाश जोशी, माऊली बनसोडे, संकेत वाघमारे, सुर्यकांत खुडे, मंगल हुंडारे, वैष्णवी रंधवे, चेतन रंधवे, बालाजी शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते.
भाजप शहराध्यक्ष किरण येळवंडे यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावरील मौलिक विचार मांडून ते आत्मसात करण्याची व त्यांच्यापासून प्रेरणा घेण्याची प्रेरणा दिली.
डॉ.राम गावडे यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनाचा परिचय करून देतांना महिलांना शिक्षनाप्रती जागृत करण्याची प्रेरणा दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भागवत काटकर तर आभार चारुदत्त प्रसादे यांनी केले.