खल्लार पोलिस स्टेशन हद्दीतील 10 जण तडीपार.

 

युवराज डोंगरे/खल्लार

डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची 132 वी जयंती हि खल्लार पोलिस स्टेशन हद्दीतील येणाऱ्या सर्वच गावात शांततेत,आनंदात व सुव्यवस्थेत, उत्साहात पार पडावी यासाठी खल्लार पोलिस स्टेशन हद्दीतील 10 जण एक दिवसाकरीता तडीपार करण्यात आले आहेत.

यात बोराळा येथील 4, उपराई येथील 1,वडुरा येथील 1,कान्होली येथील 1,नाचोना येथील 1,कमालपूर(तरोडा)येथील 1,बेलोरा येथील 1 असे एकुण 10 जण एक दिवसाकरिता तडीपार करण्यात आले असल्याची माहिती खल्लार पोलिसांनी दिली आहे.