राकेश चव्हाण
तालुका प्रतिनिधी कुरखेडा
देसाईगंज / वडसा…
घरगुती तसेच व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या वाढत्या दरांविरोधात काँग्रेस पक्षाच्या वतीने देसाईगंज (वडसा) येथील फवारा चौकात निषेध आंदोलन करण्यात आले. वाढत्या गॅस दरांमुळे सर्वसामान्य नागरिकांवर मोठा आर्थिक भार पडत असून ही दरवाढ तात्काळ कमी करावी, अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली.
काही वर्षांपूर्वी सुमारे ४०० रुपयांच्या आसपास उपलब्ध होणारा घरगुती गॅस सिलेंडर आज साडेनऊशे रुपयांपेक्षा अधिक दराने मिळत असल्याने गृहिणी, शेतकरी, कामगार तसेच मध्यमवर्गीय कुटुंबांवर अतिरिक्त आर्थिक ताण निर्माण झाला आहे. वाढत्या महागाईच्या पार्श्वभूमीवर घरगुती गॅसचा वाढलेला खर्च अनेक कुटुंबांसाठी चिंतेचा विषय ठरत आहे.
यावेळी गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे, आमदार रामदासजी मसराम प्रामुख्याने उपस्थित होते.
महेंद्र ब्राह्मणवाडे यांनी केंद्र सरकारच्या गॅस दरवाढीच्या निर्णयाचा तीव्र निषेध व्यक्त करत वाढत्या दरांमुळे सर्वसामान्य जनतेचे जीवनमान कठीण होत असून केंद्र सरकारने तात्काळ गॅस सिलेंडरच्या किमती कमी करून जनतेला दिलासा द्यावा, अशी मागणी केली.
याशिवाय व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या किमतीत झालेल्या वाढीमुळे लहान-मोठ्या व्यावसायिकांनाही आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. गॅस सिलेंडर महागल्यामुळे व्यवसाय चालवणे कठीण होत असल्याची भावना आंदोलनकर्त्यांनी व्यक्त केली.
यावेळी आमदार आरमोरी विधानसभा क्षेत्र रामदासजी मसराम साहेब, माजी पंचायत समिती सभापती परसरामजी टिकले, कोरची तालुका अध्यक्ष मनोज अग्रवाल, वडसा तालुका अध्यक्ष राजेंद्र बुल्ले,आरमोरी तालुका अध्यक्ष मिलिंद खोब्रागडे, दिलीप घोडाम, अनिल किरमे, राजू आखाडे, धर्मराव नैताम, साजन मेश्राम, सागर बन्सोड,श्याम उईके,सौं. आरती लहरी,सौं. ममता पेंदाम,सौं वैष्णवी आकरे,सौं. आशा दहिवले, सौं. मंदा समर्थ ,गुरुमीतकौर चावला, हन्सराज लांडगे,पवन गेडाम सह काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.



