Home Social चिमूर येथे संत श्री. तुकाराम महाराज सामाजिक सभागृहाचे लोकार्पण सोहळा मोठ्या उत्साहात...

चिमूर येथे संत श्री. तुकाराम महाराज सामाजिक सभागृहाचे लोकार्पण सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न…

      रामदास ठुसे

नागपूर विभागीय प्रतिनिधी

         चिमूर नगर परिषद हद्दीत आठवडी बाजार चौक येथे कुणबी समाजाच्या वतीने आयोजित संत श्री. तुकाराम महाराज सामाजिक सभागृहाचे भव्य लोकार्पण चिमूर विधानसभा क्षेत्राचे आमदार मा. श्री. किर्तिकुमार उर्फ बंटीभाऊ भांगडीया यांच्या शुभहस्ते संपन्न.

          यावेळी पद्मश्री जनार्धन पंतजी बोधे, सरचिटणीस, गुरुकुंज आश्रम, मोझरी यांचा समाजाच्या वतीने विशेष सत्कार करण्यात आला. तसेच आमदार महोदय व इतर मान्यवर पदाधिकाऱ्यांचाही यथोचित सत्कार करण्यात आला.

                उपरोक्त कार्यक्रम प्रसंगी आमदार महोदयांनी संबोधित करताना म्हटले की, या ऐतिहासिक वास्तूच्या सामाजिक सभागृहाच्या लोकार्पण सोहळ्यास उपस्थित राहता आले, हे मी माझे भाग्य समजतो. हे केवळ एक सभागृह नाही, तर हे आपल्या गौरवशाली समाजाकरिता हक्काचे व्यासपीठ आहे.

         या सभागृहाच्या माध्यमातून समाजातील सर्व घटकांची विविध कार्ये होत राहतील. हे सभागृह राष्ट्रसंताच्या नावाने असून, या ठिकाणी नगरपालिकेच्या माध्यमातून वाचनालय सुरू करण्यात येत आहे. ही भव्य इमारत चिमूरकरांच्या सेवेत उपलब्ध आहे. येथे निर्माण केलेली संताच्या नावाने असलेली ही वास्तू आपल्याला आपल्या संस्कृतीचे आणि परंपरेचे सातत्याने ज्ञान देत राहील, असे वाचनालय या ठिकाणी तयार करण्यात येत आहे.

             या सभागृहाला उत्कृष्ट कलाकृतीने सजविण्यात आले आहे. नगरपालिकेने उत्तम प्रकारे हे सभागृह निर्माण केले आहे. त्याकरिता प्रयत्न केलेल्या सर्व मान्यवरांचे मी मनःपूर्वक अभिनंदन करतो!हा क्षण सर्वांच्या चिरकाल स्मरणात राहील. या सभागृहाच्या व येथील विविध कामांसाठी नऊ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे.

              याप्रसंगी प्रामुख्याने जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे उपाध्यक्ष श्री.संजयजी डोंगरे, मंडळ प्रमुख मनिषजी तुमपल्लीवार, चिमुर शहरातील नगराध्यक्षा सौ. गिताताई लिंगायत मँडम, उपनगराध्यक्ष श्री. संजयजी नवघडे, राज्य परिषद सदस्य श्री. राजुभाऊ देवतळे, तालुका समन्वयक श्री. राजुभाऊ झाडे, बाजार समिती संचालक राज्य परिषद सदस्य श्री. घनश्यामभाऊ डुकरे, माजी जि. प. उपाध्यक्षा सौ.रेखाताई कारेकर, श्री.पि. डब्ल्यू . डी. अभियंता श्री. नितीनजी कारेकर, भिसी नगरपंचायतचे नगराध्यक्ष श्री. अतुलजी पारवे, भिसी नगरपंचायतचे उपनगराध्यक्ष श्री. किशोरजी मुंगले, श्री. गजाननजी गुळधे, श्री. विजयजी गावंडे, श्री. दिपकजी गावंडे, श्री. दिगांबर भेंडे, श्री. पंजाबरावजी शिंदे या मान्यवरांसह आदी अन्य मान्यवर पदाधिकारी तथा असंख्य समाज बांधव, शहरातील तथा ग्रामीण भागातील समस्त नागरिक उपस्थित होते.