रामदास ठुसे
नागपूर विभागीय प्रतिनिधी…
व्हाईस आॅफ मिडीया शाखा एटापल्ली पदाधिकारी पत्रकारांच्या वतीने तिन रस्त्यांचे काम मंजूर करावे,यासाठी प्रथम साखळी उपोषण केले व कालपासून आमरण उपोषणाला प्रारंभ केला होता.त्यांच्या सर्व मागण्या मान्य झाल्या असून उपविभागीय अधिकारी एटापल्ली यांनी त्या संबंधांचे लेखी पत्र आमरण उपोषणकर्ता पत्रकारांना दिले आहे.
संदर्भ दिला की व्हाईस आॅफ मिडीया शाखा एटापल्ली पदाधिकारी पत्रकारांच्या खालील प्रमाणे पत्राला अनुसरून आपल्या मागण्या मान्य करीत आहे..
संदर्भ:- ,१) आपले पत्र जा.क्र. ०२/०३ दिनांक ०२.०२.२०२६ व २) कार्यकारी अभियंता,सार्वजनिक बांधकाम विभाग, आलापल्ली यांचे पत्र जावक क्र.५३३/२०२६ दिनांक १२.०२.२०२६,
पत्रात पुढे नमूद करण्यात आले की,उपरोक्त विषयांकित प्रकरणी संदर्भीय पत्रांचे अनुषंगाने कळविण्यात येते की,व्हाईस ऑफ मिडिया, शाखा-एटापल्ली मार्फत सर्व पत्रकार संघटनांकडून एटापल्ली तालुक्यातील १) एटापल्ली देवदा गडचिरोली (रामा-३८१) २) एटापल्ली जारावंडी रस्ता (रामा-३६३) ३) एटापल्ली हेड्ड्री गड्डा रस्ता (रामा-३८१) या मुख्य रस्त्यांच्या नूतनीकरण व दुरुस्ती करिता दिनांक ०९.०२.२०२६ पासून साखळी उपोषण तसेव दिनांक १३.०२.२०२६ पासून आमरण उपोषण सुरू करण्यात आले आहे.
सदर रस्त्यांची निकड लक्षात घेता,जिल्हाधिकारी, गडचिरोली यांचे अध्यक्षतेखाली दिनांक १५.११.२०२५ रोजी उपविभागीय अधिकारी,एटापल्ली यांचे दालनात पार पडलेल्या आढावा बैठकीत,एटापल्ली देवदा गडचिरोली (रामा-३८१) व एटापल्ली हेड्री गट्टा रस्ता (रामा-३८१) या दोन्ही कामांना जिल्हा खनिकर्म योजनेतून मंजुरी देण्याबाबत सकारात्मकता दर्शवलेली आहे.
याबाबत कार्यकारी अभियंता,सार्वजनिक बांधकाम विभाग,आलापल्ली यांनी संदर्भीय पत्र क्र. ०२ अन्वये आपणास कळविले आहे.
सबब १) एटापल्ली देवदा गडचिरोली (रामा-३८१), २) एटापल्ली हेड्ड्री गड्डा रस्ता (रामा-३८१) या मुख्य रस्त्यांचे काम जिल्हा खनिकर्म योजनेतून प्रस्तावित करण्यात आले असून त्याअनुषंगाने जिल्हाधिकारी महोदयांसमक्ष जिल्हा खनिकर्म विभागाच्या अधिकाऱ्यांसमवेत उपविभागीय अधिकारी एटापल्ली यांचे कार्यालयात दिनांक १५ जानेवारी २०२६ व जिल्हाधिकारी कार्यालय गडचिरोली येथे दिनांक १० फेब्रुवारी २०२६ रोजी पार
पडलेल्या सभेत सदरची दोन्ही कामे प्रशासकीय दृष्ट्या Finalized करण्यात आले असून दिनांक १७ फेब्रुवा २०२६ रोजी होणाऱ्या Governing Council च्या सभेत प्रशासकीय मान्यतेची अंतीम कार्यवाही पूर्ण करण्यात येणार असून त्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत सदरच्या कामांना सुरवात करण्यात येईल.
करीता एटापल्ली तालुक्यातील मुख्य रस्त्यांच्या नूतनीकरण व दुरुस्ती संबंधाने सुरु असलेले आमरण उपोषणाचे आंदोलन मागे घेण्यास याद्वारे अवाहन करण्यात येत आहे.
सदर पत्र्याच्या प्रती जिल्हाधिकारी,गडचिरोली,अपर जिल्हाधिकारी अहेरी,तहसिलदार एटापल्ली,कार्यकारी अभियंता,सार्वजनिक बांधकाम विभाग,आलापल्ली यांना माहितीस अग्रेषित करण्यात आलेल्या आहेत.
उपोषणकर्ता पत्रकार यांच्या उपोषण स्थळाला भेट देतेवेळी CHAB सहायक जिल्हाधिकारी तथा उप विभागीय अधिकारी एटापल्ली Sdm अमर राऊत,Sdpo chytany कदम,सार्वजनिक बांधकाम विभागाचे Mukhy अभियंता रेखे,उपअभियंता चणेकर,जुनियर इंजिनियर आजने हे उपस्थित होते.
त्यांनी उपोषणकर्ता पत्रकारांना ज्युस देऊन आमरण उपोषणाची सांगता केली.



