कुंभीटोला वासियांना नळाद्वारे पाणी केव्हा मिळणार? ग्रामस्थांचा सवाल… — ना विद्युत कनेक्शन ना सौर ऊर्जेचा पत्ता…

     राकेश चव्हाण

कुरखेडा तालुका प्रतिनिधि 

        हर घर जल या संकल्पनेचा भारत सरकारने २०२४ पर्यंत भारतातील सर्व ग्रामीण कुटुंबांना नळ कनेक्शन द्वारे पुरेसे आणि स्वच्छ व निर्मळ सुरक्षित पिण्याचे पाणी पुरवण्यासाठी जलजीवन मिशन सुरू केले या योजने अंतर्गत प्रत्येक ग्रामीण कुटुंबाना मुबलक पाणी देण्याचे संकल्प केले आहे.

       त्या अनुषंगाने आकाशित गडचिरोली जिल्ह्यातील कुरखेडा तालुक्यातील कुंभीटोला येते नळ योजना कासवाच्या गतीने बांधकामाला सुरूवात झाली. जल जीवन मिशन पूर्ण करण्यासाठी गडचिरोली जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी स्वतः मैदानात उतरले व जिल्ह्यातील प्रत्येक तालुका पिंजून काढत व स्वतः रात्री उशिरापर्यंत कामाचा आढावा सुद्धा घेतला.

         बांधकाम करणाऱ्या ठेकेदारांना वेळोवेळी सूचना देऊन तंबी सुद्धा देण्यात आले. परंतु कुरखेडा तालुक्यातील कुंभीटोला येते. नळ योजनेच्या बांधकाकामाला कधिच गती मिळाली नाही.तरी पण का होईना कासवाच्या गतीने टाकी बांधकाम पूर्ण झाली. पण आता” हर घर जल” पोचवण्यासाठी विद्युतची आवश्यकता होती परंतु या ठिकाणी सहा महिन्यापेक्षा जास्त कालावधी लोटून सुद्धा विद्युत कनेक्शन व सौर ऊर्जा या दोन पैकी काहीच उपलब्ध न झाल्याने गावकऱ्यांना नळाद्वारे पाणी मिळू शकला नाही.

          त्यामुळे नळाची टाकी हि‌ शोभेची वस्तू बनलेली असून घराघरात नळाचा पाणी मिळण्यासाठी कुंभीटोला ग्रामवासियांना किती दिवस प्रतीक्षा करावी लागेल असा प्रश्न प्रशासनाला ग्रामस्थ विचारत आहेत. 

           येत्या आठ दिवसात जर विद्युत कनेक्शन जोडून अथवा सौर ऊर्जा बसवून नळ योजना सुरु झाली नाही तर ग्रामस्थ पंचायत समिती कार्यालयासमोर उपोषणाला बसू असा इशारा प्रशासनाला दिला आहे.