मेहंदी गावातील आरोग्य वर्धनी केंद्र तर्फे जंतनाशक मुक्ती दिवस संपन्न…

    कमलसिंह यादव 

तालुका प्रतिनिधि पारशिवणी

पारशिवनी:- पारशिवनी तालुक्यातील मेहंदी गावातील आरोग्य वर्धनी केंद्र तर्फे जंतनाशक मुक्ती दिवसा निमिताने मंगळवार दिनांक 13/2/2024 ला जंतनाशक मोहिमे अंतर्गत आरोग्य वर्धणी केन्द्र मेहंदी येथे पंचायत समिती सभापती मंगलाताई उमराव निम्बोने, पंचायत समितीचे बिडीओ सुभाषजी जाधव, गट विकास अधिकारी श्री रामकृष्णा एल कुबड़े ,तालुका आरोग्य सहायक, मेहंदी गावातील सरपंच , जिल्हा परिषद शाळेतील मुख्यध्यापक व विद्यार्थी वर्ग प्रत्यक्ष हजर होते.

         या कार्यक्रमाप्रसंगी श्री रामकृष्णा एल कुबड़े यांनी या मोहिमेचा उद्देश्य सांगून तसेच सभापति महोदय यांनी मोलाचे मार्गदर्शन केले..

        कार्यक्रमाचे संचालन आरोग्य वर्धनीचे अधिकारी यांनी केले तर सर्वांचे आभार शिक्षक राजेश माहुरकर यांनी मानले.