अनुलोम संस्थातंर्गत शासनाच्या विविध शासकीय योजनांची व उपक्रमांची नागरिकांना देण्यात आली माहिती… — सहकार्य सर्वांचे.. — अनुगामी लोकराज्य अभियान..

     कमलसिंह यादव

तालुका प्रतिनिधी पारशिवनी‌..

           पारशिवनी:- अनुगामी लोकराज्य महाभियान अर्थात (अनुलोम) ची रामटेक भाग जनसेवक धर्मेंद्र दुपारे व सरपंच महेश राऊत यांच्या हस्ते कोमलचंद भाऊरावजी चौधरी वस्ती मित्र व धर्मराज महादेव गजभिये सालाई मोकासा वस्ती मित्र यांचे तर्फे ना.देवेंद्रजी फडणवीस व्दारे प्रेषित शुभेच्छा पत्र व प्रभू श्रीराम मूर्ती भेट देण्यात आली. 

        कार्यक्रमाला प्रामुख्याने उपस्थित पोलीस पाटील अमृता ठाकरे,सद्गुरु महिला भजन मंडळ,सावळीचे बल्की प्रभाकर नेवारे,वसंतरावजी भोबडे,कोमलजी मंगुळकर,हेमलता यादवर,कुंदा शेंद्रे,योगेश शंकरराव चौरीवार,लता लांजेवार मुख्याने उपस्थित होते. 

     अनुलोम संस्थे व्दारे सामाजिक उपक्रम जसे वाचनालय,स्मशानभूमीत सौन्दर्यीकरण,वृक्षरोपंन,प्लास्टिक मुक्ती,विहीर उपसा,एक रंग एक विचार असे अनेक उपक्रम राबविण्यात आले.

       तसेच शासकीय उपक्रमांतर्गत सरकारी अधिकारी यांच्या सोबत राजस्वाभियान अभियान,स्वच्छता अभियान,असे भरपूर प्रमाणात उपक्रम राबविण्यात आले. 

      आणी वस्ती मित्र,स्थानिक मित्रांचा अधिकारी यांच्या बरोबर परिचय करून देण्यात आला.

कृषी,आरोग्य,पर्यावरण,शिक्षण,बांधकाम क्षेत्रातील योजनेचा लाभ जनतेला मिळवून देण्यात आला.

     महाराष्ट्र शासनाचे,”गाळ मुक्त तलाव गाळ युक्त तलाव, अभियान राबविण्यात आले.तर महाराष्ट्र राज्यात 5 हजार तलावाचे खोली करण करण्यात आले.त्यामुळे जमिनीची सुपीकता व तलावात पाणी सिंचन झाल्यामुळे जलमय परिसर झाला.

        संवादिनी हा उपक्रम महिलांसाठी राबविण्यात आला.त्या मध्ये महिला संदर्भात योजनेचा पुस्तिका महिलांना मिळवून दिल्यात.

          मित्र-बंधू-ताई आपल्या आपल्या सारखे व्यक्ती महत्व अनुलोमला जुडल्यामुळे समाजातील लोकांना त्यांचा निश्चितपणे फायदा मुळवून देण्याचं काम आपण सर्वजण करत आहोत.जेणेकरून ही उतंम मानव सेवा म्हणावे.

        अनुलोम संस्थेला आपण दिलेल्या साथीमूळे अनुलोमचे कार्य मोठ्या गतीने पुढे जाऊ शकते.अशी माहिती अनुलोम पारशिवनीचे धर्मेन्द दुपारे यांनी दिली.