कैंलासवासी दत्तात्रय बंडोबा सुतार( पालखे) यांच्या प्रथम पुण्यस्मरणार्थ ह भ प किशोर महाराज लोखंडे यांची कीर्तन सेवा संपन्न होणार.

 बाळासाहेब सुतार 

नीरा नरसिंहपुर प्रतिनिधी

          आकलूज पावन भूमि ही जगद्गुरु संत तुकाराम महाराजांची मुक्कामी पावन भूमी आहे.या ठिकाणी कैलासवासी दत्तात्रेय बंडोबा सुतार (पालखे) यांच्या प्रथम पुण्यस्मरणा निमित्त ह भ प किशोर महाराज लोखंडे यांची उत्साहात कीर्तन सेवा संपन्न होणार आहे.

        अकलूज तालुका माळशिरस येथील सुतार समाजाचा जाणता राजा व सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील सहकारी साखर कारखान्याचे विश्वासू माजी कामगार म्हणून ओळख आसलेले कैलासवासी दत्तात्रय बंडोबा सुतार पालखे यांच्या प्रथम पुण्यस्मरणार्थ ह भ प किशोर महाराज लोखंडे वेळापूर यांची किर्तन सेवा आकलुज यथे सुतार परिवाराच्या वतीने बुधवार दिनांक 17 /1/2024 रोजीसकाळी दहा ते बारा पर्यंत फुलाची कीर्तन सेवा संपन्न होणार आसल्याचे सुतार पालखे परिवाराच्या वतीने सांगण्यात आले आहे.

            या कार्यक्रमासाठी अकलूज नगरी मधील व इतर सर्व भागा-भागातून वारकरी व भजनी मंडळ आणि भाविक भक्त पाहुणे व समस्त ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थितीत राहणार आहेत. 

          किर्तन सेवेचा लाभ घेण्यासाठी सर्व सुतार बांधवांनी व ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे.