नामांतर म्हणजे……
विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर या जागतिक ज्ञानवंताला दिलेली मानवंदना !
नामांतर म्हणजे……
आंबेडकरी चळवळीची संघर्षाची गाथा !
नामांतर म्हणजे……..
आंबेडकरवाद्यांचा शौर्य,अस्मिता,ऐक्य नि धैर्याचा इतिहास !
नामांतर म्हणजे…….
पोचीराम कांबळेंचा धगधगता अंगार !
नामांतर म्हणजे…….
जनार्धन मेवाडे,गौतम वाघमारेंचे निर्णायक हौतात्म !
नामांतर म्हणजे……
सुहासिनी बनसोडे,प्रतिभा तायडेंचे सार्थकी बलिदान !
नामांतर म्हणजे …..
गोविंद भूरेवाल,चंदर कांबळे,नारायण गायकवाड यांचे ‘बाबा’ साठी बलिदान!
नामांतर म्हणजे……
दिलीप रामटेके,शरद पाटोळे,रोशन बोरकर यांचे ज्ञानपिठाच्या नावासाठी हौतात्म्य!
नामांतर म्हणजे…..
विलास घोगरे,अविनाश डोंगरेंची क्रांतिकारी निळी सलामी !
नामांतर म्हणजे…..
तमाम आंबेडकरी नेत्याच्या एकजुटीचा मर्मभेदी भीमटोला !
नामांतर म्हणजे……
फक्त नावासाठी नव्हे तर समतेसाठीचा लढा !
नामांतर म्हणजे…..
‘मारा’ वर मात करणारे ‘बुद्धा’चे स्मित हास्य….
शब्दांकन
उज्वलकुमार.
नामांतर_दिन_चिरायू_होवो