दोषींवर फौजदारी गुन्हे दाखल करून निलंबित करावे.. — सोशल फोरमचे कृषी सहसंचालक नागपूर यांना निवेदन.. — प्रकरण – राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानातंर्गत गैरप्रकारचे..

नागपूर विभागीय प्रतिनिधी..

     ऋग्वेद येवले

 

साकोली – तालुका कृषी अधिकारी साकोली मार्फत आर्थिक वर्ष २०१९-२० आणि २०२०-२१ (कोरोना काळात) राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान अंतर्गत १०० टक्के प्रात्याक्षिक तथा ५० टक्के अनुदानावर कडधान्य निविष्ठा व बोगस लाभार्थ्यी अनुदान वाटपाची चौकशी करून कारवाई करावी याकरिता डॉ. बाबासाहेब आंबेडकर सोशल फोरमचे वतीने महासचिव कैलास गेडाम यांचे नेतृत्वात १० ऑक्टोंबर २०२२ रोजी निवेदन देण्यात आले होते.

            तालुका कृषी अधिकारी पवनी यांनी चौकशी करून खोटा व चुकीचा अहवाल तयार केल्याने यात लिप्त व्यक्तींवर प्रशासकीय सेवा शर्ती अधिनियमातील तरतुदीनुसार कारवाई करावी याकरिता मंगळवार (ता १२) रोजी कृषी सहसंचालक नागपूर विभाग नागपूर यांना निवेदन देण्यात आले आहे. 

            त्यांचेकडून संबंधितांवर काय कारवाई केली जाते याकडे ग्रामवासी जनेतेचे लक्ष लागले आहे.

           तालुका कृषी अधिकारी साकोली अंतर्गत जांभळी /सडक येथे तत्कालीन कृषी सहाय्यक शीतल नंदागवळी,कुमारी कोरी मॅडम यांचेमार्फत पर्यवेक्षक चंदन मेश्राम यांचे मार्गदर्शनात समृद्धी बचत गटाचे माध्यमातून अध्यक्ष यामिनी रामटेके व सचिव निता चंदन मेश्राम यांचेमार्फत बोगस लाभार्थ्यांना १०० टक्के प्रात्याक्षिक व ५० टक्के अनुदानावर कडधान्य वाटप करण्यात आले.

         त्यात कैलास भागवत गेडाम जांभळी/सडक यांचे नावाने शेतजमीन नसताना गट क्रमांक ९५ आराजी १.६० हेक्टर आर असल्याचे दाखवून अनुदान लाटण्यात आल्याची माहिती होताच डॉ. बाबासाहेब आंबेडकर सोशल फोरम चे वतीने उपविभागीय कृषी अधिकारी साकोली यांचेमार्फत कृषी सहसंचालक नागपूर यांना १० ऑक्टोंबर २०२२ रोजी निवेदन देऊन चौकशी करून कारवाईची मागणी केली होती.

            कृषी सहसंचालक नागपूर विभाग नागपूर यांचेकडून ३० जून २०२३ चे पत्रानुसार चौकशी अधिकारी म्हणून तालुका कृषी अधिकारी पवनी,जिल्हा भंडारा यांची नेमणूक करण्यात आली.

          त्यांना २९ जून २०२३ बकरी ईद सुट्टीचे दिवशी पत्र मिळाले म्हणजेच पत्र निघण्याआधीच पत्र मिळाले व त्यांनी १ जुलै २०२३ रोजी शनिवारी सुट्टीचे दिवशी चौकशी केल्याचे चौकशी अहवालात नमूद असल्याने कैलास गेडाम यांनी आक्षेप घेतला असून त्यांचे नावे असलेल्या शेतजमिनीचा ७/१२ उपलब्ध करावा,प्रत्यक्ष जांभळी / सडक येथे जाऊन निवेदका समक्ष चौकशी करावी,समृद्धी बचत गटाचे अध्यक्ष,सचिव यांचेसह तत्कालीन कृषी सहाय्यक शीतल नंदागवळी,विद्यमान कृषी सहाय्यक कुमारी कोरी मॅडम आणि तालुका कृषी अधिकारी यांना निलंबित करावे असी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

           कृषी पर्यवेक्षक चंदन मेश्राम यांचे निवृत्ती वेतन थांबवून त्यांचेवरही गुन्हा दाखल करावा व अफरातफरीची रक्कम वसुल करण्यात यावी याकरिता कृषी सहसंचालक नागपूर यांना निवेदन देण्यात आले आहे. 

          कैलास गेडाम,डी.वाय.बडोले,कालिदास खोब्रागडे,दिलीप कापगते,अरविंद कठाणे यांच्या निवेदनावर स्वाक्षऱ्या आहेत.