चातगाव येथे ट्रकचे नियंत्रण सुटल्याने दुकानावर पलटी.. — श्रीराम मोबाईल शॉप चिकन सेंटर आणि कोल्ड्रिंक सेंटर चे मोठे नुकसान.. — ट्रक चालक फरार ..

धानोरा /भाविक करमनकर 

     छत्तीसगढ वरून येणारा ट्रक पहाटे साडेतीन ते चारच्या दरम्यान चातगाव येथील श्रीराम मोबाईल शॉप,चिकन सेंटर व कोल्ड्रिंग सेंटर या तीन दुकानावर ट्रक चालकाचे नियंत्रण जाऊन ट्रक पलटी झाल्यामुळे दुकानदाराचे मोठे नुकसान झाले आहे.

      हा छत्तीसगड मार्गे गडचिरोली जात असताना पहाटे साडेतीन ते चार च्या दरम्यान ट्रक चालकाचे नियंत्रण जाऊन ट्रक पलटी झाला.ट्रक क्रमांक ओ.डी. 10,के. 49 97 क्रमांकाचा ट्रक हा निलगिरीचे लाकूड घेऊन जात होता.

     ओव्हरलोड वाहतूक आणि पहाटेचा वेळ असल्याने ट्रक चालकाला डुलकी आली असावी यातच त्यांचं नियंत्रण जाऊन ट्रक पलटी होऊन श्रीराम मोबाईल शॉप ,चिकन सेंटर आणि कोल्ड्रिंग सेंटर या तीन दुकानावर कोसळला यात मोबाईल शॉप , चिकन सेंटरचे व कोल्ड्रिंक सेंटर चे बरेच मोठे नुकसान झालेली आहे.

       ही घटना चातगाव येथील अगदी पोलीस स्टेशन लागून असलेल्या ठिकाणी घडली.ट्रक चालक फरार आहे.हा ट्रक कोणाच्या कंपनीचा आहे हे अजून पर्यंत कळलेलं नाही.ही घटना पहाटेची असल्यामुळे जीवित हानी झालेली नाही.सध्या छात्तीसगड मार्गे निलगिरी च्या लाकडाचे व बांबू चि ओव्हर लोड वाहतूक मोठ्या प्रमाणात सुरु आहे.