वर्धा लोकसभा मतदार संघाचे अपक्ष उमेदवार राहुल तुलसीदास भोयर म्हणतात माझ्याकडे मतदार बंधू-भगिनींचे लक्ष… — मी शोषित पिडीत वंचीतांचा वाली.

   जाकीर सैय्यद

जिल्हा प्रतिनिधी वर्धा..

         राहुल तुलसीदास भोयर हे वर्धा जिल्ह्यातील चिरपरिचित व्यक्तीमत्व.त्यांची आर्थीक परिस्थिती बेताची असताना जनमानसात लोकशाहीचे मुल्य रुजविण्यासाठी व मतदारांचे सर्वोच्च हित जोपासण्यासाठी ते वर्धा लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवित आहेत.

   शेतकरी-शेतमजूर,गोर-गरीबांचे हितचिंतक असलेले तथा सर्वधर्म समभावी,मधूरभाषी ते समन्वयी मानुष्य म्हणून त्यांची जनमानसात ओळख आहे.

       जनहितार्थ शेतीत राबनारा शेतकरी कोडसाच्या खानी मधून हीरा निघाला असे जनमानस त्यांच्या प्रती आहे.

         वर्धा जिल्ह्यात दारू बंदी असतांना या जिल्ह्यात दारू कशी काय येत आहे? हा त्यांचा ज्वलंत प्रश्न आहे.विषारी दारू पेऊन अनेकांचे मृत्यु होत आहेत याकडे कुणाचेही लक्ष नाही,यामुळे ते वर्धा जिल्ह्यातील नागरिकांप्रती संवेदनशील आहेत.तद्वतच वर्धा जिल्हा अनाज मार्केट मध्ये कुठच्याही व्यापाऱ्यांना विक्री करता आले पाहिजे असेही त्यांचे म्हणणे आहे.

          रेल्वे फाटकामुळे येनाऱ्या-जाणाऱ्या जनतेला अडचण होत आहे,यासंबंधाने नियोजन झाले पाहिजे असेही त्यांचे मत आहे.

       एकंदरीत वर्धा लोकसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार श्री.राहुल तुलसीदास भोयर हे मतदारांना वास्तविक व सत्य परिस्थिती सांगून आपला प्रचार करीत आहेत.

***

राहुल तुलसीदासजी भोयर (रा.चिचघाट लाड़की)पो.नागजी पारडी, ता.हिगणघाट, जिल्हा वर्धा असा लोकसभा उमेदवारांचा मुळ पत्ता आहे.

त्यांचा संपर्क :- 9130312517