नालंदा बुद्ध विहार येथे महात्मा ज्योतिबा फुले जयंती उत्साहात साजरी…

युवराज डोंगरे/खल्लार

       उपसंपादक

      नालंदा बुद्ध विहार परिसरात ज्योतिराव फुले जयंती, विद्यार्थी मेळावा , महीला मेळावा आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती या चार दिवसीय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. त्यामधील पहिले पुष्प ज्योतिबा फुले यांची जयंती सोहळ्या मोठ्या स्वरूपात मोठ्या उत्साहात पार पडले.

         या भरगच्च कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी डॉ. बाबसाहेब आंबेडकर बहुउद्देशीय अध्ययन मंचेचे अध्यक्ष शंकरराव मेश्राम हे होते तर प्रमुख वक्ते म्हणून प्रा.डॉ संतोष बनसोड आणि समाजसेवक तथा सामजिक कार्यकर्ते ऍड.अरुण रौराळे धम्मपिठावर विराजमान होते. 

         प्रा.डॉ.संतोष बनसोड यांनी ज्योतिराव फुले यांचे आधुनिक भारताच्या जडणघडणीत योगदान या विषयावर आपले विचार ठेवले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अरुण रामटेके यांनी केले तर कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि पाहुण्यांचा, वक्त्याचा परिचय सुरज मंडे यांनी करून दिला.

           तर आभार प्रदर्शन पद्माकरजी मंडोधरे यांनी पार पाडले. या कार्यक्रमाचे यशस्वीेते करिता डॉ.बाबासाहेब आंबेडकर बहुउद्देशीय अध्ययन मंचचे अध्यक्ष, सचिव सह सर्व पदाधिकारी आणि नालंदा बुद्ध विहार परिसरातील बहुसंख्य उपासक उपासिका आणि नागरीक उपस्थित होते.