शासनाकडून ग्रामिण भागात मिळणारे घरकुलाचे अनुदान अपुरे, शहरी व ग्रामीण भागात मिळत असलेल्या अनुदानात तफावत…

युवराज डोंगरे/खल्लार 

         उपसंपादक

प्रत्येकाचे हक्काचे पक्के घर असावे याकरिता बेघर, गरीब, गरजू व्यक्तींना पीएम आवास योजना, रमाई आवास योजना, शबरी आवास योजना, इंदिरा गांधी आवास योजना, राजीव गांधी आवास योजना आदी योजनांच्या माध्यमातून घरकुलाचा शासनामार्फत लाभ दिला जातो परंतु घरकुल बांधण्यासाठी साहित्याचे व मुजरीचे दर सर्वच ठिकाणी सारखे असताना अनुदानात मात्र तफावत असल्याने ग्रामीण भागातील लाभार्थ्यांमधून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे . अपुऱ्या अनुदानात घर कसे बांधायचे, असा सवाल ग्रामीण भागातील घरकुल लाभार्थ्यांनी उपस्थित केला आहे.

         शासनाकडून देण्यात येणाऱ्या घरकुलासाठी नगरपालिका, नगरपंचायत क्षेत्रातील लाभाथ्यर्थ्यांना २ लाख ५० हजार रुपये अनुदान दिले जाते, तर ग्रामीण भागातील ग्रामपंचायत क्षेत्रातील लाभाथ्यर्थ्यांना १ लाख ३८ हजार रुपयांचे अनुदान दिले जाते. शहरी व ग्रामीण भागातील घरकुलाच्या अनुदानात मोठी तफावत आहे. सध्या वाळू, विटा, लोखंडी सळई, खडी, माती, मुरुम, सिमेंट आणि मजुरीचे दर गगनाला भिडले आहेत. त्यामुळे ग्रामीण भागात मिळत असलेल्या अनुदानामध्ये १लक्ष ३८ हजार रुपयांमध्ये घरकुल पूर्ण होत नाही.

          अनेक घरकुलांची बांधकामे अपूर्ण अवस्थेत पडून आहेत. काही लाभार्थ्यांनी तर घरकुल बांधण्याकडेच पाठच फिरवली आहे.घरासाठी लागणाऱ्या बांधकाम साहित्याचे दर सगळीकडे एकसारखाच असताना अनुदान कमी जास्त दिले जात आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील लाभाथ्यर्थ्यांनी संताप व्यक्त केला आहे. सद्यःस्थितीत बांधकाम साहित्यासह मजुरीचे दर गगनाला भिडले आहेत.

          त्यामुळे १ लक्ष ३८रुपयांच्या अल्प अनुदानात घरकुलाचेबांधकाम पूर्ण कसे करायचे, असा प्रश्न ग्रामीण भागातील लाभाथ्यर्थ्यांना पडला आहे. परिणामी, अनेक घरकुलांचे कामे अर्धवट अवस्थेत आहे. त्यामुळे घरकुल योजनेच्या अनुदानात शहरी क्षेत्राप्रमाणे वाढ करावी, अशी मागणी दर्यापूर तालुक्यातील ग्रामीण भागातील घरकुलाच्या लाभार्थ्यांकडून करण्यात येत आहे.

प्रतिक्रिया

         प्रत्येकाचे गरिबांचे हक्काचे घर असावे अशी आस लागलेली असते पण वाढत्या महागाईने घरकुल धारक व सामान्य नागरिकांचे कंबरडेस मोडले आहे, शहरी व ग्रामीण भागात मिळणाऱ्या अनुदानात खूप मोठ्या प्रमाणात भेदभाव केल्यास जात आहे ग्रामीण भागात सुद्धा शहरी भागात मिळणारे अनुदाना तितकेच ग्रामीण भागात सुद्धा देण्यात यावे. 

विलास मोरे, घरकुल लाभार्थी दारापूर

***

     ग्रामीण भागात शासनाकडून मिळणाऱ्या अनुदानात संडास व बाथरूम सुद्धा बांधल्या जात नाहीत तर घर कसे बांधावे म्हणून शासनाने घरकुल अनुदान तीन ते साडेतीन लाख रुपये करण्यात यावे.

शिलवंत रायबोले आक्रमण संघटना दर्यापूर तालुका अध्यक्ष