मोदी सरकारच्या दबावामुळे काही खाती बंद करावी लागत आहेत..

प्रदीप रामटेके

मुख्य संपादक

नवी दिल्ली,भारत सरकारच्या दबावामुळेच आम्हाला द्विटर म्हणजेच एक्स या सोशल मीडियावरील काही खाती बंद करणे भाग पडत आहे, हे आमच्या मनाविरुद्ध आहे, पण भारतातील नियमांमुळे आमचा नाइलाज होतो आहे असे जाहीर निवेदन ने ट्विटर  कंपनीचे प्रमुख एलन मस्क यांनी आपल्याच एक्स हँडलवरून जाहीर केले आहे.

        त्यांच्या या 7 निवेदनामुळे खळबळ उडाली आहे.भारतात अभिव्यक्ती स्वातंत्र्याची सर्रास गळचेपी होत असल्याचे जगापुढे आल्याने त्याचा भारताच्या — लोकशाही प्रतिमेला मोठा धक्का बसला असल्याचे मानले जात आहे.

   त्यांनी म्हटले आहे की, भारत सरकारने आम्हाला काही खाती बंद किंवा निलंबित करण्याचा आदेश दिला आहे. त्यानुसार आम्हाला ही कारवाई करावी लागत आहे. 

      तसे न केल्यास तुरंगवास किंवा मोठा दंड आकारण्याची कारवाई केली जाण्याची शक्यता असल्याने आम्ही भारत सरकारच्या या आदेशाचे नाईलाजाने पालन करीत आहोत पण आम्ही या कारवाईशी असहमत आहोत. 

       आम्हाला नाईलाजानेच ही कारवाई करावी लागत आहेत. बंद करण्यात आलेली खाती भारतात दिसणार नसली तर जगाच्या अन्य भागात आम्ही ती चालू ठेवली आहेत,असेही द्विटरचे म्हणणे आहे.

       सध्या शेतकऱ्यांचे पंजाब सीमेवर आंदोलन सुरू आहे.त्या आंदोलनातील अनेक शेतकरी नेत्यांची द्विटर खाती बंद करण्यात आली आहेत.तसेच सरकारच्या विरोधात आवाज उठवणाऱ्या अनेक यूट्यूब चॅनेलवरही बंदी घालण्यात आली आहे. ही बाब अधिकृतपणे जाहीर झालेली नसली तरी आता खुद्द एलन मस्क यांनीच त्याला वाचा फोडत नाराजी व्यक्त केली आहे.