ग्रामपंचायत गेवर्धा अंतर्गत मौजा खेडेगाव येथे मोदी आवास योजनेंतर्गत घरकुल बांधकामाचे भूमिपूजन… 

    राकेश चव्हाण

कूरखेडा तालुका प्रतिनिधी 

        गट ग्रामपंचायत गेवर्धा अंतर्गत मौजा खेडेगाव येथील मोदी आवास योजनेंतर्गत मंजूर घरकुल बांधकामाचे भूमिपूजन पार पाडण्यात आले.तसेच सदर लाभार्थ्यांना तात्काळ घरकुल बांधकाम करण्यात यावे अशा सूचना ग्रा.प.प्रशासनाने देण्यात आल्या.

        याप्रसंगी सरपंच सुषमा मडावी, उपसरपंच ओमप्रकाश बोगा, ग्रा.पं. सदस्य रोशन सय्यद, संगीता बुद्धे, तंटामुक्ती अध्यक्ष राजु बारई, ग्रामकोष ग्रामसभा अध्यक्ष सुरेश पुसाम, आविका संचालक योगेश गायकवाड, जयंत बुद्धे, ग्रा.पं.कर्मचारी कृष्णा मस्के, दिनेश कावळे, अमिता नाहामूर्ते, नानेश्वर मस्के आदी उपस्थित होते.