अलंकापुरीत ठाकरे गटाकडून विधानसभा अध्यक्षांचा निषेध…

दिनेश कुऱ्हाडे

    उपसंपादक

आळंदी : विधानसभा अध्यक्षांनी शिंदे गटाच्या बाजूने निकाल दिला. त्‍यानंतर ठाकरे गटाकडून आळंदीत छत्रपती शिवाजी महाराज स्मारक येथे विधानसभा अध्यक्षांचा निषेध व्यक्त करण्यात आला. 

         यावेळी निषेध व्यक्त करणारे काळे फलक व भगवे झेंडे घेत ”निषेध असो निषेध असो विधानसभा अध्यक्षांचा निषेध असो” अशा घोषणा देत ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी निषेध व्यक्त केला. जो निकाल लागला आहे तो संविधानाची कत्तल करणारा असा आहे अशा शब्दात शिवसेना नेते उत्तम गोगावले यांनी भावना व्यक्त केली.

         यावेळी माजी नगराध्यक्ष तथा उपतालुकाप्रमुख रोहीदास तापकीर, उपशहरप्रमुख मंगेश तिताडे, मनोज पवार, आशिष गोगावले, निखिल तापकीर, अनिकेत डफळ, महीला आघाडीच्या नेत्या अनिता झुजम, भारती वाघमारे, शुभांगी यादव, योगिता धुमाळ, निलम कुरधोंडकर, संगीता मेटे, उषा नेटके, भाग्यश्री घुले, जयश्री केंद्रे सर्व शिवसेना आजी – माजी पदाधिकारी, युवा सेना, महिला आघाडी व सुसंगत अंगीकृत संघटनेचे पदाधिकारी व शिवसैनिक बहुसंख्येने उपस्थित होते