आर्थिकदृष्ट्या कुमकुवत हुशार विद्यार्थ्यांना शिक्षणाकरिता ट्रस्ट दत्तक घेईल : रवींद्र शिंदे — बालसंस्कार शिबिरास रवींद्र शिंदे यांची उपस्थिती…

उमेश कांबळे ता प्र भद्रावती :

    आर्थिकदृष्ट्या कुमकुवत असलेले हुशार विद्यार्थी याना शिक्षणाकरिता दत्तक घेऊन यांचे दाईत्व स्व. श्रीनिवास शिंदे मेमोरियल रवींद्र शिंदे चारीटेबल ट्रस्ट घेईल ट्रस्टचे अध्यक्ष रवींद्र शिंदे यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात बोलून दाखविले तसेच अशा विद्यार्थ्यांनी ट्रस्ट सोबत संपर्क करण्याचे आवाहन केले.

     साईप्रकाश बहुउद्देशीय कला व शिक्षण संस्थेच्या साईप्रकाश कला अकादमी द्वारा दरवर्षी प्रमाणे यंदाही  उन्हाळी बालकुमार शिबिराचे आयोजन करत असते. या वर्षी बालकुमार फन अँड लर्न संस्कार शिबिरात सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांच्या समारोपीय बक्षीस वितरण समारोह हुतात्मा स्मारक येथे संपन्न झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी स्व. श्रीनिवास शिंदे मेमोरियल रवींद्र शिंदे चारीटेबलें ट्रस्ट घेईल ट्रस्टचे अध्यक्ष रवींद्र शिंदे उपस्थित होते. पालकांनी मुलांच्या शिक्षण व संस्काराकडे दुर्लक्ष केल्यास याचे गंभीर परिणाम भविष्यात भोगावे लागेल हि चिंता रवींद्र शिंदे यांनी व्यक्त केले. आपला पाल्य सुसंस्कृत आणि हुशार निघाल्यास हीच खरी आयुष्याची कमाई आहे असे आपल्या अध्यक्षीय भाषणात रवींद्र शिंदे म्हणाले. ट्रस्टच्या माध्यमातून आरोग्य शिबीर, दुर्धर आजारांकरिता आर्थिक मदत, शिक्षणाकरिता सातत्याने मदत केले जाते व गोरगरीब शेतकरी, गरजवंतानी ट्रस्टसोबत संपर्क साधावे असे आवाहन केले व  ट्रस्ट अश्याना निश्चित मदत करणार असे आश्वासन दिले.

    समारोपीय कार्यक्रमाप्रसंगी मंचावर प्रमुख पाहुणे म्हणून जेष्ठ पत्रकार दिलीप ठेंगे, सामाजिक कार्यकर्ते दिलीप मांढरे, सामाजिक कार्यकर्ता अलका वाटेकर, मनगटे, सिंधुताई दाते, संस्थेचे शालिक दाते आदी मान्यवर उपस्थित होते. मान्यवरांनी आप-आपले मत व्यक्त केले व विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.

      शिबिरात सहभागी झालेल्या प्रशिक्षणार्थी विद्यार्थी यांचा प्रमाणपत्र, शिल्ड, पुस्तक पेन अशी बक्षिसे मान्यवरांच्या हस्ते वितरित करून गौरव करण्यात आला. शिबिरातील विद्यार्थ्यांनी स्वतः तयार केलेल्या मातीकाम वस्तू, चित्रकारी, पेंटिंग हुतात्मा स्मारकातील दालनात ठेवण्यात आलेल्या प्रदर्शनीचे उदघाटन फित कापून रवींद्र शिंदे यांनी केले. समारोपीय कार्यक्रमाचे प्रास्ताविक विनोद ठमके, संचालन क्षितिज शिवरकर तसेच आभार प्रदर्शन शालिक दानव यांनी केले. 

     शिबिराच्या यशस्वितेकरिता सचिन बेरडे, सारिका तलमले, उषा दाते, स्नेहा ठमके, हर्षद हिरादेवे, प्रणाली पिंपळकर, राजेश येरणे, गणेश हनुमंते आदींनी परिश्रम घेतले.