राष्ट्रीय ग्रापलिंग स्पर्धासाठी निवड चाचणी १४ मे 2023 ला…..

प्रेम गावंडे

उपसंपादक

दखल न्यूज भारत

               १ ते ४ जून २०२३ कालावधीत देवास (मध्य प्रदेश) येथे १६वीं राष्ट्रीय ग्रामलिंग अजिंक्यपद स्पर्धाचा आयोजन केलेले आहे. या स्पर्धेत संपूर्ण भारताचे विभिन्न राज्य आपआपल्या राज्याचे प्रतिनिधित्व करणार आहे. म्हणून महाराष्ट्र राज्याचा (विदर्भ विभागीय) संघाची पण निवड चाचणीचे आयोजन दिनांक १४ मे २०२३ ला स्थानिक पैन्थेर्स स्पोर्ट्स अकादमी, पठानपुरा – लालपेठ रोड हनुमान मंदिर मागे चंद्रपुर येथे सकाळी ११.०० वाजता केले आहे. या निवड चाचणी मध्ये U / 09, U/12, U/15, U/17 U/19, व सिनिअर कैटेगिरी मध्ये मुले व मुली दोघांसाठी ठेवलेली आहे.

              या निवडचाचणी मध्ये निवड झालेल्या खेळाडू हे देवास (मध्य प्रदेश) येथे होणारे १६वीं राष्ट्रीय ग्रापलिंग अजिंक्यपद स्पर्धत महाराष्ट्र राज्याचे प्रतिनिधित्व करणार आहे. या निवळ चाचणीत येता वेळी खेळाडूनी बोनाफाइट प्रमाणपत्र, आधार कार्ड व पासपोर्ट साइज़ फोटो आणने आवश्यक आहे. ही निवड चाचणी स्पर्धा संपूर्ण विदर्भ विभागासाठी आहे. तसेच या मध्ये महाराष्ट्राचे कोणते ही जिल्हे सहभागी होऊ शकतात. या निवड चाचणीच संपूर्ण महाराष्ट्राचे तसेच विदर्भाचे जास्तीत जास्त खेळाडूनी सहभाग होण्याचे आव्हान जिल्हा संघटनाचे अध्यक्ष उमेश पंधरे यांनी केली तसेच अधिक माहितीसाठी जिल्हा संघटनाचे सचिव मुकेश पाण्डेय – ७०२०८३६५६६ यांचाशी संपर्क साधावा. खेळाडूचे नोंदणी हे ऑनलाईन पण घेण शुरू आहे.