वाईस ऑफ मीडिया शाखा धानोरा, तर्फे धरणे आंदोलन… — तहसीलदार यांना पत्रकाराच्या विविध मागण्याचे नीवेदन… — तालुका काँग्रेस कमेटी धानोरा यांचे पत्रकारच्या मागण्यासाठी समर्थन…

धानोरा /भाविक करमनकर 

        माध्यमाकडे लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून पाहिले जाते मात्र माध्यमच्या प्रश्नांना सोडवणुकीच्या दृष्टीने उपाययोजना केल्या जात नाहीत आम्ही व्हॉइस ऑफ मीडियाच्या माध्यमातून आज राज्यव्यापी आंदोलनाच्या माध्यमातून खालील मागण्या घेऊन आंदोलनाचे निवेदन तहसीलदार वीरेंद्र जाधव यांना दिले पत्रकाराच्या मागण्या पुढील प्रमाणे 

1)पत्रकारासाठी स्वतंत्र कल्याणकारी महामंडळ स्थापन करून त्यांना भरीव निधी द्यावा 2)पत्रकारितेत पाच वर्षे पूर्ण केलेल्या पत्रकारांना सरसकट अधिस्वीकृती पत्रिका देण्यात यावी

3) वृत्तपत्रांना सध्या जाहिरातीवर लागू असलेल्या जीएसटी रद्द करावा

4) पत्रकारांच्या घरासाठी विशेष बाब म्हणून शासकीय भूखंड देण्याचा निर्णय घ्यावा 

5)कोरोनात जीव गमावलेला पत्रकारांना फ्रंट लाईन वर्कर म्हणून दर्जा देऊन त्यानुसार मयत पत्रकारांच्या कुटुंबाचे पुनर्वसन करणे 

6)शासनाचे सध्याचे जाहिरात धोरण व वर्ग दैनिक यांना मारक आहे लघु दैनिकांनाही मध्यम दैनिका इतक्याच जाहिराती देण्यात याव्यात साप्ताहिकानाही त्या प्रमाणात जाहिराती द्याव्यात

 

 इत्यादी मागण्यासाठी आज

 तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन देण्यात आले व्हॉइस ऑफ मीडिया च्या मागण्यासाठी तालुका काँग्रेस कमेटी समर्थन दिल्याने व्हॉइस ऑफ मीडिया ने आभार मानले यावेळी वाईस आफ मीडिया धानोरा चे अध्यक्ष शरीफ कूरेशी,भाविकदास करमनकर उपाध्यक्ष समीर कूरेशी उपाध्यक्ष दिवाकर भोयर कार्याध्यक्ष, सीताराम बडोदे, श्रावण देशपांडे, बंडू हरणे,अरूण चापले,देवा कुणघाटकर मारोती भैसारे ओम देशमुख उपस्थित होते.