राकेश चव्हाण
कूरखेडा तालुका प्रतिनिधी
आदिवासी ग्रामीण विकास शिक्षण संस्था द्वारा संचालित श्रीराम विद्यालय तथा उच्च माध्यमिक विद्यालय व वाणिज्य विज्ञान वरिष्ठ महाविद्यालय कुरखेडा येथे शिक्षण घेऊन वर्ष २०२४/२५-च्या गडचिरोली पोलीस शिपाई भरती मध्ये विद्यालयातील १२ माजी विद्यार्थ्यांनी बाजी मारून कुरखेडा तालुक्याचा व श्रीराम कनिष्ठ वरिष्ठ महाविद्यालय कुरखेडा व आई वडील व गावाचा नाव लौकीक केला आहे.
महाराष्ट्र गडचिरोली पोलीस शिपाई भरतीमध्ये निवड झालेल्या कुरखेडा तालुक्यातील विद्यार्थी सुजल धोंडने वाकडी, कल्याणी कृष्णाजी पाटणकर जांभुळखेडा, श्रुती कसारे कुरखेडा ,साहिल बोदेले गोठणगाव, पल्लवी मडावी मोहगाव, प्रतीक्षा लाडे तळेगाव अदनान पठाण कुरखेडा ,सुमेध रामटेके गेवर्धा, विकास रामलाल घाटघुमर पांडूटोला, केतन अशोक कुंभरे झिप्राटोला, रितिक वालदे कुरखेडा,जानवी कुकुडकर पोटगाव या माजी विद्यार्थ्यांची गडचिरोली पोलीस शिपाई भरती मध्ये निवड झाल्याने माजी विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला आहे.
यावेळी व्यासपीठावर संस्था सदस्य व माजी सिनेट सदस्य चांगदेव फाये, प्राचार्य नागेश्वर फाये, प्राचार्य देवेंद्र फाये, सेवानिवृत्त शिक्षक नरहरी माकडे, संजय शिरपूरवार, डी.एम नाकतोडे सर, प्राध्यापक प्रदीप पाटणकर, शिक्षिका लता राऊत, प्राध्यापिका अश्विनी फाये, प्रा. विनोद नागपूरकर उपस्थित होते.
यावेळी शाळा समिती सदस्य चांगदेव फाये, प्राचार्य नागेश्वर फाये यांनी निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे कौतुक करीत त्यांना पुढील वाटचाली करता शुभेच्छा दिल्या.
यावेळी पोलीस भरती मध्ये निवड झालेल्या विद्यार्थ्यांनी आपला परिचय देऊन विद्यार्थ्यांना अपयश जरी आले तरी जिद्द चिकाटी आणि मेहनतीच्या बळावर तुम्ही येत संपादन करू शकता असा संदेश दिला.
सूत्रसंचालन प्रा. विनोद नागपूरकर यांनी केले तर आभार प्रा.प्रदीप पाटणकर यांनी मानले.



