राकेश चव्हाण
तालुका प्रतिनिधी कुरखेडा
राज्याच्या टोकावरील कोरची तालुक्यातील अती दुर्गम कैमुल येथे विविध स्थानिक समस्यांवर तोडगा काढण्यासाठी चर्चा सत्राचे आयोजन करण्यात आले होते.या सत्राला आमदार श्री.रामदासजी मसराम यांनी उपस्थित राहून नागरिकांशी थेट संवाद साधत,या परिसरातील जनसामान्यांच्या समस्या शासन दरबारी रेटून त्या सोडविण्यासाठी सदैव प्रयत्न करणार असे आश्वासन दिले.
यावेळी कैमुल परिसरातील रस्ते,पाणीपुरवठा,वीज,आरोग्य व इतर मूलभूत सुविधांसी संबंधित अनेक समस्या परिसरातील नागरिकांनी आमदार रामदास मसराम यांच्या निदर्शनास आणून दिल्या.
गावकऱ्यांच्या वतीने विविध मागण्यांचे निवेदनही आमदार श्री.रामदासजी मसराम यांना सादर करण्यात आले.आमदार मसराम यांनी सर्व समस्या लक्षपूर्वक ऐकून घेत संबंधित विभागांमार्फत तात्काळ पाठपुरावा करून समस्यांचे निराकरण करण्याचे आश्वासन दिले.
तसेच शासनाच्या विविध योजनांचा लाभ नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी प्रशासनाला सूचना देण्यात येतील,असेही त्यांनी यावेळी सांगितले.
या कार्यक्रमाल कोरची तालुका कांग्रेस अध्यक्ष मनोज अग्रवाल,काँग्रेस कमिटी जिल्हा उपाध्यक्ष सदरुजी भामानी,माजी जिल्हा परिषद सदस्य रामसुराम काटंगे,काँग्रेसचे ज्येष्ठ पदाधिकारी विठ्ठल शेंडे,माजी सभापती कचरीबाई काटंगे,हिनाबाई कोरेटी,मधुकर मेश्राम,मानसिंग नैताम,जीवन नरुटी,तुलाराम मडावी,जगदीश काटंगे,नारदजी मुलेटी,मदन पोरेटी,मडावी सर,हरिचंद्र मेश्राम,कुंडलिक मेश्राम,द्वारका मेश्राम,मनीषा कोरेटी,सुनिता धुणे,अनिता उईके,पुष्पा कल्लो,शेजुराम उईके,पंजाबराव उईके,नत्थुलाल उईके,रामसाई मडावी व स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.



