Home देशविदेश देवच नाही,तर देवळे कशाला?

देवच नाही,तर देवळे कशाला?

          देव आहे,असे जेंव्हा आपण म्हणतो,याचा अर्थ ‘ असणे ,’ म्हणजे त्याचे अस्तित्व मान्य करणे होय.आहे म्हणजे असणे,जे आहे,ते एक तर डोळ्याला दिसते,कारण ती वस्तू असते,आणि समाजा जी वस्तू नाही,परंतु एक पदार्थ आहे,जे डोळ्याला दिसत नाही,परंतु शरीराला त्याचा स्पर्श होतो,त्याची जाणीव होते,उदा.हवा.दिसत नसली तरी ती जाणवते.दुसरे उदाहरण फुलाचा वास,दिसत नाही,पण नाकाला जाणवतो,म्हणजे वास आहे,म्हणजे त्याचे अस्तित्व आहे,याची जाणीव होते.तिसरे उदाहरण ” दुधातील लोणी “. लोणी दुधात असते,दुधात दही लोणी तूप असते,ते दिसत नाही,पण घुसळण केल्यावर ते काढता येतात.प्रक्रिया करावी लागते.

    देव आहे,हे सिद्ध करण्यासाठी बरेच पुजारी,पुरोहित,कीर्तनकार,कथाकार,धार्मिक ग्रंथ हे हवेचे,लोणीचे उदाहरण देतात,सांगतात की,दिसत नसले तरी ते आहेत.

     अर्थात देवाच्या अस्तित्वाचे उदाहरण देताना,त्या उदाहरण प्रमाणे फुलाचा वास नाकाला जाणवतो,हवा शरीराला जाणवते,लोणी घुसळण करून काढता येते,तसे देवाचे बाबतीत घडत नाही,म्हणून ही उदाहरण देऊन देव आहे,हे सिद्ध करता येत नाही.खरे तर ही उदाहरणे देणे चुकीचे आहे.तरी अडाणी,भोळे भाबडे लोक ही उदाहरणे खरेच मानतात.याचे कारण लोकांकडे चौकस बुद्धी नसते,परीक्षण,निरीक्षण ते करीत नाहीत.म्हणून ‘ बाबा वाक्यम प्रमाणम्म ‘ म्हणून गप्प राहतात.

     म्हणून मला सांगावेसे वाटते की,’ मुक्की बिचारे कुणी हाका,अशी मेंढरे बनू नका ‘. कुणीही यावे,टिकली मारून जावे,अशी गत होऊ नये.

     आपण माणूस जातीत जन्मास आलोत.प्राणी पक्षी वृक्ष नाही,आपणास बुद्धी आहे,विचार आहेत,पण त्याचा वापर करीत नाही,आणि ज्याचा वापर होत नाही,ती वस्तू गंज खाते,निरुपयोगी होते,ती काहीच कामाची राहत नाही.तिला भंगाराच्या भावाने विकल्या जाते.असे होऊ नये,आपल्या बुद्धीची किंमत भंगार भावाची होऊ नये ,याची काळजी घ्यावी,पदवीधर विचारवंतांच्या बुद्धीला सुद्धा गंज चढताना दिसते.त्यांची बुद्धी पण भंगार भावाने विकल्या चालली आहे.याचे कारण ते बुद्धीचा दुरुपयोग करीत आहेत.साहित्यिक कलाकारांचे पण असेच. अडाणी असो , अशिक्षित असो की सुशिक्षित सारेच ” देव ” का मानतात ? सद्गुरूस शरण का जातात ,? यांना गुरूची गरज का पडते ? याचे मुख्य कारण म्हणजे,” तुज आहे तुज पाशी,परी तू जागा चुकलाशी, अतः दीप भव,तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार,अंतर्मनाचि ज्योत पेटव,” अशा उपदेशावर ,विचारावर हे अंधश्रद्धा पाळणारे लोक विश्वास ठेवत नाहीत.श्रद्धा आणि अंधश्रद्धा यातील फरक ओळखत नाहीत,बुवा, बाबा,महाराज यांच्यावरच विश्वास ठेवतात,ते जे सांगतील तेच खरे, बाकी सारे खोटे,असे समजतात.परंतु ते जे सांगतात,ते खरे की खोटे ? याची पडताळणी करीत नाहीत.कारण ते आळशी असतात.बुद्धीला ताण देणे त्यांना नको असते.म्हणून असे लोक अंधश्रद्धाळू बनतात आणि आपले आर्थिक नुकसान करून घेतात,मानसिक स्थिती बिघडवून घेतात,देवधर्मात पागल होतात.पागल लोकांसारखे वागतात.व्यवहार करतात.

      सत्य म्हणजे काय ? ते कसे शोधावे ? आणि सत्यच बोलावे, सत्यच आचरण करावे,हे यांना माहीत नसते.म्हणून देव ही एक मानव निर्मित संकल्पना आहे, ती तपासून पहिल्या शिवाय तिचा स्वीकार करू नये,याची जाणीव त्यांना नसते.

    सत्य तपासायचे काही माप किंवा ठोकताळे आहेत,ते असे 1 जे सत्य आहे,सत्य म्हणजे असणे,अस्तित्व .हे तपासण्यासाठी आपली पंजेंद्रिय कामी येतात, डोळे, कान,नाक,जीभ,त्वचा.डोळ्याला दिसते ते सत्य,नाकाला वास जाणवते,जिभेने चव समजते, मीठ दिसते पण चव दिसत नाही,तरी जिभेने ओळखता येते.कानाला ऐकू येते.आवाज दिसत नाही तरी.हवा दिसत नसली तरी त्वचेने अनुभव घेता येते.असे असेल तर देव जर असेल आणि दिसत जरी नसला तरी पंचद्रियास अनुभवास यायला पाहिजे होता,मग तो कितीही सूक्ष्म असला तरी.पण असा अनुभव होत नाही,या वरून सिद्ध होते की,देव नाही.2 दुसरी कसोटी ही की,वैद्न्यानिक प्रयोग करून, प्रयोग शाळेत जसे हायड्रोजनचे दोन परमाणु आणि ऑक्सिजन वायूचा एक परमाणु चे संयोग करून पाणी तयार करता येते,तसेच पाण्याला विशिष्ट वातावरणात त्याची वाफ करता येते, बर्फ बनविता येते,त्यास थंड गरम करता येते,या प्रमाणे प्रयोग करून देवाचे अस्तित्व सिद्ध करता येत नाही.3 तिसरी गोष्ट म्हणजे तर्क.तर्काने पण सिद्ध करता येत नाही.

 याचा अर्थ देवाचे अस्तित्व अनुभवाने,तर्काने,प्रयोगाने म्हणजेच कोणत्याही पद्धतीने सिद्ध करता येत नाही,म्हणून देव नाही,असेच म्हणावे लागते,जो भेटत नाही,दिसत नाही,जाणवत नाही,सिद्धही करता येत नाही,यावरून तो कितीही सूक्ष्म असला तरी त्याला अस्तित्व नाही,हेच सिद्ध होते.तो सूक्ष्म नाही स्थूलही नाही,तो सगुण नाही निर्गुण नाही,कारण तो दिसत नसला तरी गुणांचा अनुभव झाला असता.उदा. वास,दिसत नाही पण जाणवतो,गुण दिसत नाहीत,पण जाणवतात किंवा त्यांचा अनुभव घेता येतो,असे पण इथे घडताना दिसत नाही.

    तात्पर्य हे की,देवाचे अस्तित्व नाही,म्हणजेच ईश्वर ही निव्वळ काल्पनिक गोष्ट होय.त्यात तथ्य काहीच नाही.

    ज्यांना या कल्पनेचा,संकल्पनेचा फायदा वाटतो,त्यांनी बरोबर या गोष्टीचा प्रभावीपणे प्रचार प्रसार केला आहे,यासाठी पोथीपुराने,साहित्य,गाणी,गोष्टी,कथा,कीर्तन,भजन तयार केली,ती जनसामान्यत पसरवली.त्यांचेगळी उतरवली. हे काम ब्राम्हण वर्गाने केले,कारण जुन्याकाळी भारतात मनुस्मृतीचा कायदा होता,ब्राम्हणाने च शिक्षण घेतले पाहिजे.कारण ते पृथ्वीतलावरील भूदेव आहेत.याचा अर्थ त्यांनाच लिहिता वाचता येत होते,म्हणून त्यांनीच देव,भूत,भविष्य निर्मिले.बहुजनांना हे विषयच माहीत नव्हते.जे आर्यब्रम्हणांनी यांच्या डोक्यात घुसविले,यासाठी त्यांनी 100 वर्ष प्रयत्न केले,शेवटी याकामी ते यशस्वी झाले.

      आता विषय असा आहे की,देवच नाही तर मग देवळे तरी कशासाठी ? हे सरकार आणि आमदार खासदार यांनी मते मिळवण्यासाठी जनतेची मागणी नसताना पण आमदारनिधी खासदारनिधी केवळ देवळे बांधण्यासाठी देण्याचा धूमधडाका चालविला आहे.देवळे ऐवजी शाळा,समाजमंदिर, सभागृह,वाचनालये,खेळांचे मैदान,गार्डन,स्मशानभूमी यावर खर्च करणे इष्ट आहे.या लोकोपयोगी कार्या ऐवजी ज्या देवाला गरज नाही,ती देवळे बांधून देत आहेत.जीर्णोद्धार चे नावाने जुनी चांगली मजबूत दगडाची देवळे पाडून तिथे केवळ 50 वर्षच टिकतील अशी देवळे बांधीत आहेत.असलेली देवळे पडण्याची गरज नसताना,लोकांची मागणी नसताना हे चुकीचे कृत्य आमदार खासदार करीत आहेत,लोकांना प्यायचे पाणी मिळत नाही.सांडपाण्याची व्यवस्था नाही,तर यांना देव आणि देवळाची काळजी,किती हा विरोधाभास.कधी कळणार हे मतदारांना ?

       लेखक : दत्ता तुमवाड

        सत्यशोधक समाज नांदेड

दिनांक : 12 मार्च 2026, फोन : 9420912209