कुरखेडा येथील विश्व हिंदू परिषद बजरंग दल व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पदाधिकारी रामलल्लाचे दर्शन घेण्याकरिता अयोध्याकरिता रवाना…

    राकेश चव्हाण

कुरखेडा तालुका प्रतिनिधि 

         अयोध्येच्या भव्य श्रीराम मंदिरात २२ जानेवारीला प्रभु रामचंद्राची प्राणप्रतिष्ठा केली गेली आहे. या प्राणप्रतिष्ठेचे थेट प्रक्षेपण बघितल्यानंतर विश्व हिंदू परिषदेच्या पदाधिकारी व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्वयंसेवकांमध्ये दर्शनाची आस लागली होती. कुरखेडा तालुक्यातील रामभक्तांमध्ये प्रचंड उत्साहाचे वातावरण दिसुन आले होते.

          आज कुरखेडा येथील श्रीराम मंदिरात राम लक्ष्मण जानकी व हनूमतरायाचे पुजन व आरती करून विश्व हिंदू परिषदेचे पदाधिकारी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक व बजरंग दल व दुर्गावाहीनी चे पदाधिकारी कुरखेडा येथून रामलला चे दर्शन घेण्यासाठी प्रस्थान केले.

           यावेळी विश्व हिंदू परिषदेचे जिल्हाध्यक्ष वामनराव फाये, नानाजी खुणे, पुंडलिक नागपूरकर महाराज, मुरलीधर देशमुख, डॉ.बाबुलाल कावळे, नरहरी माकडे , प्रल्हाद पाटील खुणे,कुंवर लोकेंद्रशहा सयाम महाराज, श्रीहरी गायकवाड,लांजेवार, आशाताई बानबले, प्रणाली बसोना, व ईतर पदाधिकारी हे प्रभू श्रीरामाचे दर्शन घेण्याकरिता प्रस्थान केले. यावेळी हभप नेवारे महाराज यांनी त्यांच्या सूखद‌ प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी राम भक्त मोठ्या संख्येत उपस्थित होते.