कन्हान इंदिरानगर,शिवनगर,आनंदनगर तर्फे संयुक्तरित्या “राजेंद्र मुळक सहायता कक्ष आपल्यादारी”आरोग्यशिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद…

    कमलसिंह यादव 

तालुका प्रतिनिधि पारशिवणी

      पारशिवनी::- दिनांक 11/02/2024 रोज रविवारला कन्हान नगरपरिषद अंतर्गत श्री.राजेंद्र मुळक (माजी मंत्री अध्यक्ष नागपूर जिल्हा ग्रामीण काँग्रेस कमिटी) यांच्या संकल्प नेतून अनेक वर्षापासून राजेंद्र मुळक सहायता कक्षाच्या माध्यमातून गावातील गरजू लोकांना जनहितार्थ राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांचा लाभ मिळावा या करीता कन्हान न.प येथील इंदिरा नगर,शिव नगर,आनंद नगर  तर्फे  संयुक्त पद्धतीने इंदिरा नगर, हनुमान नगर, येथिल पटांगणात मोफत वैद्यकीय तपासणी, नेत्र तपासणी तथा निःशुल्क चष्मा वाटप इत्यादी आरोग्यसेवांचा लाभ सर्वसामान्य लोकांना मिळवून देण्यात आला. 

1) सामान्य आरोग्य तपासणी – 444

2) चष्मे वितरण – 269

3) वोटिंग कार्ड – 69

4) आयुष्मान कार्ड – 70

5) पॅन कार्ड – 11

इत्यादी नागरिकांनी या शिबिराचा लाभ घेतला.

     यावेळी श्री.राजेश यादव(अध्यक्ष,कन्हान शहर काँ.क व नगरसेवक कन्हान न. प.), सौ.रिताताई बर्वे (अध्यक्ष,कन्हान शहर महिला काँ.क), श्री.योगेंद्र (बाबु) रंगारी(उपाध्यक्ष, कन्हान न.प.व नगरसेवक कन्हान न. प.) , कु. रेखा टोहणे (नगर सेविका,कन्हान), श्री शरद वाटकर, श्री.रवि रंग, सौ.सुनीता मानकर, सौ.छायाताई रंग, सौ.मीनाताई वाटकर, सौ.मीनाताई ठाकूर,श्री.सतीश भसारकर, श्री.अकिब सिद्दिकी, श्री. चंद्रशेखर बोरकर, श्री. मोनू खान, श्री.मनोहर भुरे, श्री.गुलाबराव वाडेकर, श्री.गिरीश मोहनकर, श्री. रितेश चडी, सौ.मिनाताई गिऱ्हॆ, सौ. इंद्रकला गरडकर, श्री.प्रगती बावनकुळे इत्यादी मान्यवर व ग्रामवासी गण उपस्थित राहून शिबिराचा लाभ घेतला.